‘फ्लाईट’ची नवीन ब्रँड अम्बेसेडर सान्या मल्होत्रा; स्टाईल, आत्मविश्वास आणि देखणेपणासह भारताला पुढे जाण्याची प्रेरणा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रिलॅक्सो फुटवेअर्स लिमिटेडचा एक ब्रँड असलेल्या ‘फ्लाईट’ ने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राला त्यांचा नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. फ्लाईट हा भारतातील एक आघाडीचा कौटुंबिक फॅशन फुटवेअर ब्रँड आहे. या घोषणेसोबतच, फ्लाईटने येणाऱ्या सण आणि लग्नसराईसाठी खास डिझाइन केलेली नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. यामुळे ग्राहकांना प्रत्येक प्रसंगासाठी स्टाईलिश पर्याय उपलब्ध होतील. ही घोषणा एका दमदार ३६०- डिग्री मार्केटिंग मोहिमेला धरून आहे, जी आत्मविश्वास, वेगळेपणा आणि स्टाईलसह पुढे जाण्याचा संदेश देते.
‘सर उठा, कदम बढा’ या फ्लाईटच्या ब्रीदवाक्याला साजेसा असा सान्याचा प्रवास आहे. तिच्या निर्भीड वृत्तीसाठी आणि उत्साही ऊर्जेसाठी ती ओळखली जाते. या भागीदारीद्वारे, फ्लाईटचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांना स्टाईलचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. फ्लाईटच्या मते, स्टाईल ही स्वतःला व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे आणि त्यातून आत्मविश्वास वाढतो.
जीएसटी सुधारणांमुळे बाजार तेजीत पण वाढीची गती झाली कमी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला
रिलॅक्सो फुटवेअर्स लिमिटेडचे पूर्ण वेळ संचालक गौरव कुमार दुआ म्हणाले, “सान्याला ‘फ्लाईट’ चा चेहरा बनवून आम्हाला खूप आनंद झाला आहे. या वर्षी आम्ही तरुणाईला आकर्षित करणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी एक नवीन आणि आकर्षक डिझाईन बाजारात आणत आहोत. तरुण, महत्त्वाकांक्षी आणि डिझाइनची जाण असलेली सान्या आजच्या भारताचे प्रतिनिधित्व करते. फ्लाईट एक असा फॅशन फुटवेअर ब्रँड आहे जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांना साथ देतो, त्यांना स्टाईल आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करतो. सान्याला फ्लाईट ची ब्रँड ॲम्बेसेडर बनवून आणि आमच्या नवीन मोहिमेसोबत, आम्ही ‘सर उठा कदम बढा’ हे ब्रीदवाक्य एका नव्या उंचीवर नेत आहोत. प्रत्येक पावलावर आत्मविश्वासाने आणि स्टाईलने पुढे जाण्यासाठी आम्ही भारताला प्रेरणा देत आहोत.”
उच्च दर्जाच्या सिनेमॅटिक ऊर्जेसह चित्रित केलेला हा चित्रपट सान्याच्या प्रेरणादायी प्रवासाला दाखवतो. तिचा हा प्रवास रिहर्सल आणि ऑडिशन्सच्या दिवसांपासून ते थेट रेड कार्पेटपर्यंतचा आहे. हा चित्रपट दर्शकांना हे आठवण करून देतो की यश हे चिकाटीनेच मिळते. तिच्या कथेतील प्रत्येक टप्पा फ्लाईटच्या एका विशिष्ट फुटवेअर जोडीने दर्शवला आहे. हे प्रतीक आहे की, प्रत्येक पाऊल स्टाईलिश आणि आत्मविश्वासाने भरलेले असू शकते.
“फ्लाईट परिवारात सामील झाल्याबद्दल मी खरोखरच खूप आनंदी आहे. कारण आत्मविश्वास, आराम आणि स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवणे, या सर्व गोष्टींवर माझाही विश्वास आहे,” असे भारतीय बॉलिवूड अभिनेत्री, सान्या मल्होत्रा म्हणाली. ती पुढे म्हणाली, “ब्रँडचे ‘सर उठा कदम बढा’ हे ब्रीदवाक्य, कोणत्याही भीतीशिवाय आणि स्वतःच्या शैलीत पुढे जाण्याचा संदेश देते. मुंबईत आल्यापासून अभिनेत्री बनण्यापर्यंतच्या माझ्या स्वतःच्या प्रवासाशी ही मूल्ये जोडलेली आहेत.”
रिलॅक्सो फुटवेअर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष (मार्केटिंग) मनोज लालवाणी, या मोहिमेबद्दल म्हणाले, “सान्यासोबतची ही भागीदारी केवळ एक ब्रँड भागीदारी नसून, आमच्या प्रवासातील एका नवीन आणि रोमांचक अध्यायाची सुरुवात आहे. आम्ही ही भागीदारी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक 360 डिग्री मोहीम सुरू करत आहोत. ही मोहीम डिजिटल माध्यमांपासून रिटेलपर्यंतच्या अनेक ठिकाणांहून ग्राहकांशी जोडली जाईल. प्रत्येक पावलावर ग्राहकांना स्टाईल आणि आत्मविश्वास स्वीकारण्यासाठी प्रेरणा देईल. ‘हर कदम स्टाईलिश’ ही तुमची जीवनशैली आणि ‘सर उठा कदम बढा’ हा तुमचा पुढील मार्ग असावा, यासह आम्हाला विश्वास आहे की, देशभरातील ग्राहकांकडून या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळेल आणि ती ग्राहकांच्या मनात घर करून बसेल.”
या मोहिमेद्वारे, फ्लाईटने एक साधा पण शक्तिशाली संदेश दिला आहे: खरा आत्मविश्वास स्टाईलने सुरू होतो. आणि तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल, तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात, हे ठळकपणे सांगू शकते.