Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! लाल रंगात होणार बाजाराची सुरुवात… तज्ज्ञांनी दिले संकेत

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आजही दबाव कायम राहण्याची शक्यता असून प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडू शकतात. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी काही निवडक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 08:17 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! लाल रंगात होणार बाजाराची सुरुवात... तज्ज्ञांनी दिले संकेत

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! लाल रंगात होणार बाजाराची सुरुवात... तज्ज्ञांनी दिले संकेत

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीच्या संकेतांनुसार सेन्सेक्स आणि निफ्टी आज गॅप-डाउन सुरुवात करू शकतात.
  • तज्ज्ञांनी सारेगामा इंडिया, टेक महिंद्रा, एनएमडीसी आणि कोफोर्जसह अनेक शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
  • आजच्या व्यवहारात ओला इलेक्ट्रिक, विप्रो, अ‍ॅक्सिस बँक आणि एनएचपीसी या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहू शकते.
India Share Market Update: २ जून रोजी आज भारतीय शेअर बाजार लाल रंगात उघडणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास २०० पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, २३,२६२ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: जूनच्या पहिल्याच आठवड्यात सोन्या – चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरातील भाव तपासा

सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,४०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ५०८.४० अंकांनी, म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी घसरून ७४,२६७.३४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १६५.१५ अंकांनी, म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून २३,३८२.६० वर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ५९६.१० अंकांनी, म्हणजेच १.१०% ने घसरून ५३,६४३.१० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाटी चार शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये सारेगामा इंडिया लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड आणि हॅपी फोर्जिंग्स लिमिटेड यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी निवडलेल्या शेअर्समध्ये एनएमडीसी, आयजीएल आणि कोफोर्ज यांचा समावेश आहे.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, विप्रो, एनएचपीसी, अनंत राज, अ‍ॅक्सिस बँक, आयशर मोटर्स, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, एसीएमई सोलर होल्डिंग्स, पीएनसी इन्फ्राटेक, फिनो पेमेंट्स बँक या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, एनबीसीसी (इंडिया), रेडिंग्टन आणि एलटीएम या पाच शेअर्सची शिफारस केली आहे.

Mumbai Real Estate: मुंबईत घरांची रेकॉर्डब्रेक खरेदी! मे महिन्यात 14 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णूकांत उपाध्याय आणि चॉईस ब्रोकिंगचे आकाश शाह यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी खालील पाच स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एजिस लॉजिस्टिक्स, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, एनबीसीसी (इंडिया), शैली इंजिनिअरिंग प्लास्टिक्स, जेबीएम ऑटो, एजिस लॉजिस्टिक्स यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Sensex nifty may open lower experts recommend these stocks to buy in indian share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
2

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
4

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.