
Share Market Today: ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीचा बाजारावर परिणाम? या स्टॉक्सवर ठेवा तुमची नजर
गुरुवारी भारतीय शेअर बाजारात शॉर्ट कव्हरिंग रॅली दिसून आली, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,६०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स 789.74 अंकांनी, म्हणजेच 1.06 टक्क्यांनी वाढून 75,398.72 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 50 277.00 अंकांनी, म्हणजेच 1.18 टक्क्यांनी वाढून 23,689.60 अंकांवर स्थिरावला. आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आणि कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. राजा व्यंकटरमण यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये निप्पॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट लिमिटेड, झायडस लाईफसायन्सेस लिमिटेड, बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड आणि अल्काइल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज खरेदी आणि विक्रीसाठी तीन शेअर्सची निवड केली आहे. ज्यामध्ये स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय बँक आणि एसएमएल महिंद्रा यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांच्या मते आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पाच शेअर्स फायद्याचे ठरू शकतात. सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार इंडस टॉवर्स, आरबीएल बँक, अदानी ग्रीन एनर्जी, नॅटको फार्मा आणि श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर हे शेअर्स खरेदी करू शकतात.