नवी दिल्ली : शेअर बाजार आणि सोन्या-चांदीच्या दराचे (Gold and Silver Rate) खरंतर विरोधी गणित असते. शेअर बाजारात जोरदार तेजी येते तेव्हा सोने-चांदीची किंमत घसरते. मात्र शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता दिसू लागताच सोन्या-चांदीचे दर वाढतात. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे भावही वाढताना दिसत आहेत. भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोने (Gold Rate today) आणि चांदीचे दर वाढलेले दिसून आले. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ५०, २१४ एवढे नोंदवले गेले. तर चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. एक किलो चांदीचे दर ६४,१३३ रुपयांपर्यंत पोहोचले.
[read_also content=”दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकला ईडीने घेतलं ताब्यात, मनी लाँड्रींग प्रकरणी होणार चौकशी https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/ed-took-custody-of-iqbal-kaskar-from-thane-police-nrsr-240705.html”]
आज २४ कॅरेट शुद्धता असलेल्या एक तोळा सोन्याचे दर आज ५००१३ रुपयांपर्यंत पोहोचले. तर २२ कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्याचे दर ४५,९९६ रुपये झाला आहे. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही वाढले असून ते ६४१३३ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असतो. किंबहुना काही मिनिटांच्या अंतरानेही सोन्याच्या दरात घट किंवा वाढ होत असते. पूर्वी सोन्याचे दर दिवसातून दोन वेळाच जाहीर केले जात होते, मात्र आता त्यात सातत्याने बदल होत असतात. आज जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, कालच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०५ रुपयांनी वाढ झाली. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ९६ रुपयांची वाढ झाली. तसेच शुद्ध चांदीच्या दरातही ३४८ रुपये प्रति किलो अशी वाढ झाली.