उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह बांधण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी,अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे.सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना भेटून महानगरपालिका क्षेत्रातील भटकी कुत्री, भटकी जनावरे मुक्त करण्यासाठी ताबडतोब कोंडवाडा निवाराकेंद्र उभा करा या मागणीचे निवेदन नितीन शिंदे यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी दिले. महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांनी आणि जनावरांनी नागरिकांच्यावर हल्ले नागरिकांना जखमी केलेले आहे व भटक्या जनावराच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या भटक्या कुत्र्याचा उपाय करण्यासाठी महापालिकेने राबवलेली नसबंदी मोहीम पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. तसेच या योजनेत लाखोंचा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह बांधण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी ,अशी मागणी ही करण्यात आली आहे.