मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे आज लातुरात असून, मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच ते समाज बांधवांच्या गाठीभेटी घेत आहेत. यादरम्यान दुपारच्या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर येथे येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या भावना आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. चर्चेतून तोडगे निघत असतात आणि चर्चेतून निश्चितच मार्ग निघेल, असे मत त्यांनी व्यक्त केले… तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या विकास कामांबाबत काही आक्षेप असल्यास आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करू असेही मंत्री सरनाईक म्हणाले.