साई किशोर(फोटो-सोशल मीडिया)
Sai Kishore out of Buchi Babu tournament due to injury : अखिल भारतीय बुची बाबू स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तामिळनाडूला मोठा झटका बसला आहे. तमिळनाडूचा कर्णधार आर साई किशोर दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी साई किशोर बरा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत तो बरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मागील रविवारी चेन्नईतील गुरु नानक कॉलेज ग्राउंडवर खेळण्यात आलेल्या फर्स्ट-डिव्हिजन क्लब सामन्यात एम शाहरुख खानच्या चेंडूवर फॉलो-थ्रू दरम्यान ड्राइव्ह मारून चेंडू पकडत असताना साई किशोरला हाताला दुखापत झाली होती. दुलीप ट्रॉफीमध्ये साई किशोर दक्षिण विभागाचा एक महत्वाचा भाग आहे. स्पिन ऑलराउंडर आर साई किशोर ४ सप्टेंबरपासून बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याच्या मोहिमेला सुरवात करणार आहे.
हेही वाचा : देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
साई किशोरने तमिळनाडूसाठी खेळलेल्या ४८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजीत २३.५७ च्या सरासरीने एकूण २०३ बळी टिपले आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ५७ धावा देत ७ विकेट्स ही राहिली आहे. त्याने १३ वेळा एका डावात पाच विकेट्स स्टिच एक वेळ एका सामन्यात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. फलंदाजीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने १४.३१ च्या सरासरीने ८१६ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८१ धावा राहिली आहे.
साई किशोर जखमी झाल्यामुळे त्याच्या जागी शाहरुख खानला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. शाहरुख खानला तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन ११ चा कर्णधार बनवले आहे. या स्पर्धेत तामिळनाडूतील दोन संघ सहभागी होणार आहेत. फलंदाज प्रदोष रंजन पॉलला दुसऱ्या संघाचा कर्णधार बनवले आहे. तर आंद्रे सिद्धार्थला उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
बुची बाबू स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. ज्यामध्ये सर्व चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ त्याच्या गटात तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर गटातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. नॉकआउटमधील सर्व सामने ४ दिवसांचे असणार आहेत. ज्यामध्ये दररोज ९० षटकांचा खेळ खेळवला जाईल.
एम शाहरुख खान (कर्णधार), बूपती वैष्ण कुमार (उपकर्णधार), एम. सिद्धार्थ, बी. सचिन, तुषार रहेजा, किरण कार्तिकेयन, एस. मोहम्मद अली, एस. हृतिक ईश्वरन, एस. आर. आतीश, एस. लक्ष्य जैन, पी. विघ्नेश, आर. सोनू यादव, डी. टी. चंद्रशेखर, डी. दीपेश, जे. प्रेम कुमार, ए. एसाक्किमुथु, टी. डी. लोकेश राज.
TNCA अध्यक्ष इलेव्हन संघ: प्रदोष रंजन पॉल (कर्णधार),बी इंद्रजित, विजय शंकर, आंद्रे सिद्धार्थ (उपकर्णधार), आर. विमल खुमर, एस. राधाकृष्णन, एस. लोकेश्वर, जी. अजितेश, जे. हेमाचुडेसन,सी.व्ही. अच्युथ, एच. त्रिलोक नाग, आर.एस. अंबरीश, पी. सरवण कुमार, पी. विद्युत, के. अभिनव.