शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतीच्या बांधावर तिरंगा झेंडा फडकावून शेतकऱ्यांकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आहे.ज्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश सरकारला देण्यात आला आहे.तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात,हे अभिनव आंदोलन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आलं आहे.