Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market : इराण-अमेरिका वाद विकोपाला! चर्चेतून तोडगा नाही; उद्या शेअर बाजारात भूकंप येणार?

जागतिक राजकारणातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली असून, यामुळे भू-राजकीय तणाव आता आणखी शिगेला पोहोचणार आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 12, 2026 | 06:16 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ
  • भू-राजकीय तणाव आता आणखी शिगेला पोहोचणार
  • हे घटक बाजारातील दिशा ठरवतील
Stock Market Outlook: जागतिक राजकारणातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली असून, यामुळे भू-राजकीय तणाव आता आणखी शिगेला पोहोचणार आहे. या अस्थिरतेचे पडसाद उद्या म्हणजेच सोमवारी भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीवर उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

स्वस्त विम्याच्या नादात लाखो रुपयांचा चुना लागू शकतो! ‘Full Recovery’साठी ‘या’ Policy ठरणार बेस्ट?

मागील आठवडा गुंतवणूकदारांसाठी चांगला

गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरला. ३०-शेअर असलेला BSE Sensex ४,२३०.७ अंकांनी, म्हणजेच ५.७७ टक्क्यांनी वधारला, तर NSE Nifty देखील १,३३७.५ अंकांनी, म्हणजेच ५.८८ टक्क्यांनी उसळला. विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवला आहे की, पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेचा अनिर्णित निकाल सोमवारी म्हणजेच १३ एप्रिलला शेअर बाजार उघडल्यावर गुंतवणूकदारांचं मत बदलू शकतं.

विश्लेषकांच्या मते, पश्चिम आशियातील घडामोडी तसेच कच्च्या तेलाच्या किमती, १३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात बाजाराची दिशा ठरवणार आहेत. मंगळवारी म्हणजेच १४ एप्रिलला डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार असल्याने हा आठवडा अल्प सुट्टीचा असणार आहे. त्यामुळे गणितं कशा प्रकारे बदलतील हे पाहूयात

अमेरिका-इराण चर्चा अनिर्णित

एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने रविवारी स्पष्ट केलं की, अमेरिकेच्या बाजूने केलेल्या अवाजवी मागण्यांमुळे कोणतीही वाटाघाटी न होता चर्चा संपली. पण, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई म्हणाले की, राजनैतिक वाटाघाटी कधीच संपत नाहीत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स हेही म्हणालेत की, इराणने आपला अणुकार्यक्रम मागे न घेतल्यामुळे शांतता करार होऊ शकला नाही. दरम्यान, इराणी बाजूने सांगितले की, काही मुद्द्यांवर सहमती झाली, परंतु २ ते ३ महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद कायम आहेत.

लाइव्हलाँग वेल्थचे संशोधन विश्लेषक, हरिप्रसाद के म्हणाले की, निफ्टी ५० सध्या एका नाजूक वळणावर आहे. २४,००० चा टप्पा पुन्हा गाठल्यानंतर बाजारात सावध आशावाद दिसत होता, परंतु चर्चा अयशस्वी झाल्यामुळे नजीकच्या काळातील दृष्टिकोन बदलला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कोणताही तोडगा न निघता चर्चा संपल्यास, संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसलेल्या अस्थिरतेप्रमाणेच बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यांच्या मते, सोमवारी प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडू शकतात.

हे घटक बाजारातील दिशा ठरवतील

या आठवड्यात, महागाईची आकडेवारी, कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींचा बाजारावर प्रभाव पडणार आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन प्रमुख अजित मिश्रा यांनी स्पष्ट केलं की, गुंतवणूकदार विप्रो, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवून असतील. याशिवाय, १३ एप्रिल रोजी ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI आणि १४ एप्रिल रोजी घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI यांची आकडेवारी जाहीर केली जाईल, ज्यामुळे महागाईचा कल लक्षात येईल. त्यामुळे या सगळ्याचा आता बाजारावर कसा परिणाम होतोय.

LIC Bonus Share : LIC पहिल्यांदाच बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, कधी होणार मोठी घोषणा?

Web Title: Share market next week prediction nifty sensex inconclusive iran us talks failed market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • bse
  • BSE Sensex
  • Business News
  • Marathi News
  • Stock
  • Stock market
  • Stock market news

संबंधित बातम्या

India Forex Reserve: भारताचा परकीय चलनसाठा 1.08 अब्ज डॉलरने वाढला; पण सोन्याच्या साठ्यात का झाली घट? जाणून घ्या कारण
1

India Forex Reserve: भारताचा परकीय चलनसाठा 1.08 अब्ज डॉलरने वाढला; पण सोन्याच्या साठ्यात का झाली घट? जाणून घ्या कारण

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
2

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
3

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
4

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.