Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aviation Stocks : युद्धाची भीती सरताच विमान कंपन्यांचे Shares सुसाट! Indigo आणि SpiceJet मध्ये तेजी

राण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी (Ceasefire) होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर शेअर बाजारात IndiGo चा शेअर ११ टक्क्यांनी वधारला, तर SpiceJet मध्ये ५ ते १० टक्क्यांचे अप्पर सर्किट पाहायला मिळाले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 08, 2026 | 01:43 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी आजचा दिवस आनंदाचा
  • शेअर बाजारात IndiGo चा शेअर ११ टक्क्यांनी वधारला
  • SpiceJet मध्ये ५ ते १० टक्क्यांचे अप्पर सर्किट
Share of Interglobe Aviation : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजार चांगलाच दबावाखाली होता. पण या सगळ्या परिस्थितीत भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी (Ceasefire) होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर शेअर बाजारात IndiGo चा शेअर ११ टक्क्यांनी वधारला, तर SpiceJet मध्ये ५ ते १० टक्क्यांचे अप्पर सर्किट पाहायला मिळाले. सेन्सेक्समधील शेअर्सपैकी, इंडिगोची मूळ कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. BSE वर सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर ११ टक्क्यांनी वाढून ४,७३७.४० रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात तो ४,२६८.३५ रुपयांवर बंद झाला होता आणि आज ४,६३९.७० रुपयांवर उघडला. पश्चिम आशियातील शस्त्रसंधीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे SpiceJet च्या शेअर्सनी ५ टक्क्यांनी अप्पर सर्किट गाठले आहे.

एयरलाइन कंपन्यांच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये फ्यूलचा मोठा वाटा

कच्च्या तेलाच्या किमतीतील अलीकडील वाढीमुळे एटीएफच्या (ATF) किमतीत लक्षणीय वाढ झाली होती. ज्यामुळे विमान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती होती. याचे कारण असे की, एयरलाइन कंपन्यांच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये फ्यूलचा मोठा वाटा असतो. ATF च्या किमतीतील घसरणीमुळे एयरलाइन कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होऊ शकते. शिवाय, पश्चिम आशियातील शांततेमुळे विमानं लांब पल्ल्याने जाणार नाहीत. २८ फेब्रुवारी रोजी इराण आणि अमेरिका/इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. ती पण या युद्धाच्या शांततेच्या काळात पुन्हा नव्याने सुरु होईल.

जेफरीजने किंमतीत केली कपात

जगातील सर्वात व्यस्त इंटरनेशनल एयरपोर्ट हब असलेले दुबई, तसेच अबू धाबी आणि दोहा ही विमानतळं बंद आहेत किंवा या विमानतळावरुन मर्यादित उड्डाणंच सुरू होती. तेथील सामान्य हवाई वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने भारताची सर्वात मोठी विमान कंपनी, इंडिगोला याचा जास्त फायदा होईल. यामुळेच आज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. जेफरीजने इंडिगोच्या स्टॉकवरील ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे, पण त्याचे टारगेट प्राइस ₹६,१४० वरून ₹५,५०० पर्यंत कमी केले आहे.

इंडिगो शेअर्स

आज सकाळच्या सत्रात इंडिगोच्या शेअर्समध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली. पश्चिम आशियातील शस्त्रसंधीमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये एटीएफ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे विमान कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाची किंमत

इराण युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली . मार्चमध्ये, त्या प्रति बॅरल सुमारे १२० डॉलरवर पोहोचल्या होत्या, जी युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनची सर्वात उच्च पातळी मानली जाते. मार्चमध्ये, किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या, जी इतिहासातील सर्वात मोठी वाढ होती. पण युद्धविराम झाल्यानंतर त्यात मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड सध्या ९३.९० डॉलरवर व्यवहार करत आहेत. त्यात १४.०७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Web Title: Shares of interglobe aviation the operator of indigo jump 11 percent as iran war ceasefire marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Aviation
  • IndiGo
  • Indigo Crisis
  • IndiGo flight
  • indigo news
  • share
  • share market

संबंधित बातम्या

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
2

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

विमान तिकीट बुक केल्यानंतर दर कमी झाले? MakeMyTrip ने लाँच केलं Price Drop Protection; असा घेता येईल फायदा
3

विमान तिकीट बुक केल्यानंतर दर कमी झाले? MakeMyTrip ने लाँच केलं Price Drop Protection; असा घेता येईल फायदा

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
4

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.