इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
शेतकरी संघटनांनी उड्डाणे रद्द केल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून नुकसानभरपाई, तसेच अशा परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील एअरलाइन्समार्फत तातडीने पर्यायी उड्डाणे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
विमानांचे कामकाज स्थिर होत आहे. तसेच सुरक्षा उत्तम आहे, प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी सांगितले.
काही प्रवासी तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या सामानाची वाट पाहत आहेत. येथील एक प्रवासी त्यांच्या आईसोबत लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कानपूरहून पुण्याला प्रवास करत होते.