Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती

Singapore Airlines India GM : आंतरराष्ट्रीय विमान कंपनी 'सिंगापूर एअरलाइन्स'ने (SIA) भारतासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा केली आहे. अश्विन के. यांची भारताचे नवे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी १ ऑगस्ट २०२६ पासून आपला पदभार स्वीकारला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 02:25 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा!
  • भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती
  • १ ऑगस्टपासून स्वीकारला पदभार
Singapore Airlines India GM : आंतरराष्ट्रीय विमान कंपनी ‘सिंगापूर एअरलाइन्स’ SIA ने ( Singapore Airlines India GM ) भारतासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा केली आहे. अश्विन के. हे श्री. एस. वाय. येन चेन यांची जागा घेतील. एस. वाय. येन चेन यांनी पाच वर्षांहून अधिक काळ भारताचे जनरल मॅनेजर म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय बाजारात सिंगापूर एअरलाइन्सच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पण त्यानंतर आता त्यांची जागा अश्विन के. घेणार आहेत.

Ethanol Government Subsidy : मोठा निर्णय! आता इथेनॉलवर केंद्राकडून मिळणार सबसिडी! कोणाला, कसा फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर

संपूर्ण कामकाजाचे आणि विस्ताराचे नेतृत्व

भारताचे नवे जनरल मॅनेजर म्हणून अश्विन के. हे देशभरातील सिंगापूर एअरलाइन्सच्या संपूर्ण कामकाजाचे आणि विस्ताराचे नेतृत्व करतील. यापूर्वी ते २०२४ पासून इटलीचे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणी त्यांनी आपली उत्तम छाप पाडली. त्यानंतर आता आपल्या या नव्या भूमिकेत, ते कंपनीच्या सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारांपैकी एक असलेल्या भारतीय बाजारपेठेकडे लक्ष्यकेंद्रिय करतील. त्या अनुषंगाने वाढीच्या रणनीतीचे नेतृत्व करणात आहेत. तसेच ट्रॅव्हल ट्रेड पार्टनर्स, ग्राहक आणि उद्योगातील प्रमुख भागधारकांशी असलेले संबंध जपून ठेवण्याचे आणि अधिक दृढ करण्याचं देखील काम करतील.

१२ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव

अश्विन के. यांना सिंगापूर एअरलाइन्सचा १२ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. ते २०१४ मध्ये ‘ॲव्हिएशन नेटवर्क ॲनालिस्ट’ म्हणून कंपनीत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पश्चिम आशिया आणि आफ्रिकेचे ‘रीजनल मार्केटिंग मॅनेजर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे त्यांनी बंगळुरू येथे कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांचे स्टेट मॅनेजर आणि त्यानंतर ‘गल्फ अँड मिडल ईस्ट’चे जनरल मॅनेजर म्हणूनही काम पाहिले, जिथे त्यांनी या प्रदेशातील व्यावसायिक कामकाजाची धुरा सांभाळली होती. भारतात येण्यापूर्वी ते इटलीचे जनरल मॅनेजर होते.

सिंगापूर एअरलाइन्ससाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा बाजार

आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अश्विन के. म्हणाले, “जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारांपैकी एक असलेल्या भारतात सिंगापूर एअरलाइन्सच्या कामकाजाचे नेतृत्व करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे. भारत हा सिंगापूर एअरलाइन्ससाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा बाजार आहे. आम्ही आमची पोहोच आणखी मजबूत करत असताना आमचे ग्राहक, ट्रॅव्हल ट्रेड पार्टनर्स आणि इंडस्ट्री स्टेकहोल्डर्सशी जोडले जाण्यासाठी मी उत्सुक आहे”.

विमान वाहतूक क्षेत्र बदलत

त्यांनी पुढे नमुद केलं की, “आंतरराष्ट्रीय प्रवासाची मागणी जसजशी वाढत आहे आणि विमान वाहतूक क्षेत्र बदलत आहे, तसतसे आम्ही आमच्या विस्तृत जागतिक नेटवर्कद्वारे दर्जेदार सेवा आणि जागतिक दर्जाची उत्पादने देण्यास कटिबद्ध आहोत.” अश्विन के. हे मुंबईतून आपले कामकाज पाहणार आहेत. मुंबई हे सिंगापूर एअरलाइन्सच्या भारतातील सर्व कामकाजाचे मुख्य कार्यालय आहे.

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी

Web Title: Singapore airlines india gm appoints aswin k general manager

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Airlines
  • Business News
  • Marathi News
  • Singapore

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.