(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दुसऱ्या पिढीतील उद्योजक असलेले चॅटर्जी त्यांचे वडील आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंजनमय चॅटर्जी यांनी स्थापन केलेल्या ग्रुपच्या मुख्य ब्रँड मेनलँड चायनाच्या वारशाशी बालपणापासून जवळून जुडले गेले आहेत. या सहवासामुळे त्यांची व्यवसायाबद्दलची समज सुरुवातीपासून अधिक परिपक्व झाली आहे आणि आता हीच समज त्यांच्या नेतृत्वाची दिशा ठरवत आहे.
डायरेक्टर आणि सीईओ म्हणून चॅटर्जी आता स्पेशलिटी रेस्टॉरंट्सच्या विस्तृत पोर्टफोलिओची जबाबदारी सांभाळतील, ज्यामध्ये मेनलँड चायना, ओ! कलकत्ता, एशिया किचन बाय मेनलँड चायना, सिग्गी, हॉपीपोला, एपिसोड वन, स्वीट बंगाल, गॉन्ग, वॉल्टर्स बर्गर (क्यूएसआर) आणि भारत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इतर रेस्टॉरंट फॉरमॅट्सचा समावेश आहे. कंपनीच्या विद्यमान ब्रँड्सना अधिक दृढ करणे, नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करणे, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींनुसार रेस्टॉरंटच्या नवीन संकल्पना तयार करणे आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर देणे ही त्यांची प्रमुख प्राधान्ये असतील.
नेतृत्वाबद्दल मत व्यक्त करत स्पेशलिटी रेस्टॉरंट्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अंजनमय चॅटर्जी म्हणाले, “अवीक या व्यवसायात लहानाचा मोठा झाला आहे. गेल्या काही वर्षांत त्याने मेनू आणि फॉरमॅट विकसित करण्यापासून ते कामकाज आणि ब्रँड धोरणांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे. हा बदल आमच्या दोघांसाठीही एक नैसर्गिक टप्पा आहे. अध्यक्ष म्हणून मी या व्यवसायाशी जवळून जुडलेला राहीन. दैनंदिन कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवल्यामुळे कंपनीला प्रस्थापित ताकद आणि या क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीची स्पष्ट समज या दोघांचाही लाभ घेता येईल.”
आपल्या नियुक्तीबद्दल मत व्यक्त करत स्पेशलिटी रेस्टॉरंट्स लिमिटेडचे डायरेक्टर आणि सीईओ अवीक चॅटर्जी म्हणाले, “स्पेशलिटी रेस्टॉरंट्सने गेल्या तीन दशकांत अशा ब्रँड्सची निर्मिती केली आहे, जिथे ग्राहक वारंवार येतात. सीईओ म्हणून माझी भूमिका ही पायाभूत रचना बदलण्याची नसून अधिक दृढ करण्याची आहे. आम्ही आमच्या मुख्य ब्रँड्सना दृढता देणे सुरूच ठेवू, तसेच क्लाउड किचन, लहान जागेतील रेस्टॉरंट्स आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयींनुसार तयार केलेल्या नवीन फॉरमॅट्सवर अधिक भर देऊ”.
चॅटर्जी पुढे म्हणाले, “येत्या तीन तिमाहींमध्ये आमचे डिलिव्हरी नेटवर्क वाढवण्यासाठी क्लाउड किचनच्या सहाय्याने मुंबईत १२ ते १५ नवीन वॉल्टर्स स्टोअर्स सुरू करून आमची उपस्थिती लक्षणीयरित्या वाढवण्याचे ध्येय आहे. त्याच वेळी आम्ही कामकाजातील कार्यक्षमता सुधारणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करू. येत्या तिमाहींसाठी आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे: यशस्वी उपक्रमांचा विस्तार करणे, आमच्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या टीम्सना सक्षम करणे आणि योग्य शहरांमध्ये योग्य फॉरमॅट्ससह विचारपूर्वक विस्तार करणे.”

