Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Speciality Restaurants New CEO : अवीक चॅटर्जी स्पेशलिटी रेस्टॉरंट्सचे नवे सीईओ; मेनलँड चायनासह अनेक ब्रँड्सची सांभाळणार धुरा

Speciality Restaurants New CEO : 'मेनलँड चायना', 'ओ! कलकत्ता' आणि 'एशिया किचन' यांसारख्या लोकप्रिय रेस्टॉरंट साखळीची मालकी असलेल्या स्पेशलिटी रेस्टॉरंट्स लिमिटेडने अवीक चॅटर्जी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नती केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 05:35 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अवीक चॅटर्जी बनले स्पेशलिटी रेस्टॉरंट्सचे नवे सीईओ!
  • क्लाउड किचन आणि विस्तारावर देणार भर
  • मुंबईत १५ नवीन स्टोअर्सची योजना
Speciality Restaurants New CEO : स्पेशालिटी रेस्टॉरंट्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२७ च्या ( Speciality Restaurants New CEO ) पहिल्या तिमाहीपासून अवीक चॅटर्जी यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती केली आहे. यापूर्वी त्यांनी स्पेशलिटी रेस्टॉरंट्समध्ये इनोव्हेशन अँड न्यू फॉरमॅट्सचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले होते, जिथे संपूर्ण ग्रुपमध्ये रेस्टॉरंटच्या नवीन संकल्पना आणि रूपरेषा विकसित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Apollo Hospital FDA Raid : एक्सपायर्ड जेवण देत होतं हॉस्पिटल, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार! FDA च्या कारवाईत उघड

दुसऱ्या पिढीतील उद्योजक असलेले चॅटर्जी त्यांचे वडील आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंजनमय चॅटर्जी यांनी स्थापन केलेल्या ग्रुपच्या मुख्य ब्रँड मेनलँड चायनाच्या वारशाशी बालपणापासून जवळून जुडले गेले आहेत. या सहवासामुळे त्यांची व्यवसायाबद्दलची समज सुरुवातीपासून अधिक परिपक्व झाली आहे आणि आता हीच समज त्यांच्या नेतृत्वाची दिशा ठरवत आहे.

विस्तृत पोर्टफोलिओची जबाबदारी

डायरेक्टर आणि सीईओ म्हणून चॅटर्जी आता स्पेशलिटी रेस्टॉरंट्सच्या विस्तृत पोर्टफोलिओची जबाबदारी सांभाळतील, ज्यामध्ये मेनलँड चायना, ओ! कलकत्ता, एशिया किचन बाय मेनलँड चायना, सिग्गी, हॉपीपोला, एपिसोड वन, स्वीट बंगाल, गॉन्ग, वॉल्टर्स बर्गर (क्यूएसआर) आणि भारत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इतर रेस्टॉरंट फॉरमॅट्सचा समावेश आहे. कंपनीच्या विद्यमान ब्रँड्सना अधिक दृढ करणे, नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करणे, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींनुसार रेस्टॉरंटच्या नवीन संकल्पना तयार करणे आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर देणे ही त्यांची प्रमुख प्राधान्ये असतील.

हा बदल आमच्या दोघांसाठीही एक नैसर्गिक टप्पा

नेतृत्वाबद्दल मत व्यक्त करत स्पेशलिटी रेस्टॉरंट्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अंजनमय चॅटर्जी म्हणाले, “अवीक या व्यवसायात लहानाचा मोठा झाला आहे. गेल्या काही वर्षांत त्याने मेनू आणि फॉरमॅट विकसित करण्यापासून ते कामकाज आणि ब्रँड धोरणांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे. हा बदल आमच्या दोघांसाठीही एक नैसर्गिक टप्पा आहे. अध्यक्ष म्हणून मी या व्यवसायाशी जवळून जुडलेला राहीन. दैनंदिन कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवल्यामुळे कंपनीला प्रस्थापित ताकद आणि या क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीची स्पष्ट समज या दोघांचाही लाभ घेता येईल.”

नवीन फॉरमॅट्सवर अधिक भर देऊ

आपल्या नियुक्तीबद्दल मत व्यक्त करत स्पेशलिटी रेस्टॉरंट्स लिमिटेडचे डायरेक्टर आणि सीईओ अवीक चॅटर्जी म्हणाले, “स्पेशलिटी रेस्टॉरंट्सने गेल्या तीन दशकांत अशा ब्रँड्सची निर्मिती केली आहे, जिथे ग्राहक वारंवार येतात. सीईओ म्हणून माझी भूमिका ही पायाभूत रचना बदलण्याची नसून अधिक दृढ करण्याची आहे. आम्ही आमच्या मुख्य ब्रँड्सना दृढता देणे सुरूच ठेवू, तसेच क्लाउड किचन, लहान जागेतील रेस्टॉरंट्स आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयींनुसार तयार केलेल्या नवीन फॉरमॅट्सवर अधिक भर देऊ”.

ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यावर लक्ष

चॅटर्जी पुढे म्हणाले, “येत्या तीन तिमाहींमध्ये आमचे डिलिव्हरी नेटवर्क वाढवण्यासाठी क्लाउड किचनच्या सहाय्याने मुंबईत १२ ते १५ नवीन वॉल्टर्स स्टोअर्स सुरू करून आमची उपस्थिती लक्षणीयरित्या वाढवण्याचे ध्येय आहे. त्याच वेळी आम्ही कामकाजातील कार्यक्षमता सुधारणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करू. येत्या तिमाहींसाठी आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे: यशस्वी उपक्रमांचा विस्तार करणे, आमच्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या टीम्सना सक्षम करणे आणि योग्य शहरांमध्ये योग्य फॉरमॅट्ससह विचारपूर्वक विस्तार करणे.”

Tukaram Munde Advice : Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही? तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

Web Title: Speciality restaurants new ceo ltd announces avik chatterjee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Market

संबंधित बातम्या

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
1

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
2

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
3

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
4

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.