Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SpiceJet Layoffs: SpiceJet एअरलाईन बुडणार? भयंकर कर्जामुळे आर्थिक संकट, पायलट आणि क्रू मेंबर्स तणावात…

देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली स्पाईसजेट कंपनी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. परिणामी, कंपनीने भयंकर निर्णय घेतला आहे. आपला कर्मचारी वर्ग कमी करण्याचा मोठा निर्णयामुळे आता परिस्थिती गंभीर झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 11, 2026 | 05:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SpiceJet एअरलाईन बुडणार?
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे पगार नाहीत
  • पायलट आणि कर्मचारी तणावामध्ये
SpiceJet Layoffs: देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली स्पाईसजेट कंपनी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. परिणामी, कंपनीने एक भयंकर निर्णय घेतला आहे.  आपला कर्मचारी वर्ग कमी करण्याचा मोठा निर्णय घेतल्यामुळे आता परिस्थिती फार गंभीर झाली आहे. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी, कंपनीने आपल्या २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना विनावेतन तात्पुरत्या रजेवर पाठवणार असल्याचं समोर आलं आहे.

Petrol – Diesel स्वस्त होणार? रिफायनरींच्या नफ्यावर सरकारने घातली मर्यादा; इंधन नुकसानभरपाईसाठी मोठा निर्णय

वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे पगार नाहीत

कंपनीत सध्या ६,८०० लोक काम करतात, त्यापैकी अनेकांना कामावरून कमी केलं जाणार आहे. कंपनीकडे आता फक्त १३ विमाने शिल्लक आहेत, ज्यात १० बोईंग आणि ३ क्यू४०० विमानांचा समावेश आहे. आणखी चौदा विमाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. आपल्या आर्थिक अडचणींमध्ये, कंपनीने इतर वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे पगार दोन ते तीन महिन्यांपासून दिलेले नाहीत. १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची टीडीएस आणि पीएफची रक्कम थकबाकी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीचा काय परिणाम होईल या महत्त्वाचा मुद्दा आहे.

स्पाईसजेट मोठ्या कर्जात

कर्जात बुडाल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. अलीकडेच, एका इंग्लिश न्यायालयाने विमान भाडेपट्टीशी संबंधित एका वादात एअरलाइनला अंदाजे ६८ कोटी रुपये देण्याचा आदेश दिला आहे. या नवीन निर्णयामुळे आधीच तोट्यात असलेल्या कंपनीचे आर्थिक संकट आणखी वाढले आहे. एअरलाइनने एप्रिल २०२५ पासून टीडीएस आणि जीएसटी देखील जमा केलेला नाही. परिणामी, एअरलाइनचे कर्मचारी आणि वैमानिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

पायलट आणि कर्मचारी तणावामध्ये

स्पाईसजेटमधील कर्मचारी कपातीमुळे अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा ताण आला आहे. या कर्मचारी कपातीमुळे केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ आणि काही अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. किती नोकऱ्या कमी होणार आहेत हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही, परंतु कंपनीतील आणि कंपनीबाहेरील सूत्रांनुसार ही कर्मचारी कपात अनेक टप्प्यांमध्ये होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पायलटांना २१ दिवसांचे काम दिले जाईल आणि त्यांना ९ दिवसांची सुट्टी घ्यावी लागेल.

Startup ना Kotak कडून मदतीचा हात! ‘Kotak BizLabs’साठी 71 कंपन्यांची निवड; मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं अनुदान

Web Title: Spicejet layoffs because of cash crunch facing a financial crisis due to massive debt pilots and crew members are under immense stress marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • air india
  • Airline
  • Airlines
  • Aviation
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.