Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रब्बी हंगामामधील प्रधानमंत्री पीक विमा घेण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर; विमा शुल्क केवळ 1 रुपये

शासनातर्फे प्रधानमंत्री पीक वीमा अवघ्या एक रूपयात देण्यात येतो. रब्बी हंगांमाकरिता पीक वीमा काढण्याची अंतिम मुदत ही 15 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याअगोदर वीमा काढणे अपेक्षित आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 12, 2024 | 08:33 PM
रब्बी हंगामामधील प्रधानमंत्री पीक विमा घेण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर; विमा शुल्क केवळ 1 रुपये
Follow Us
Close
Follow Us:

राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे.

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.

गिग वर्कर्संना मिळणार पेन्शन,आरोग्य विमा सुविधा; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

समाविष्ट पिके : रब्बी हंगाम

तृणधान्य व कडधान्य : उन्हाळी भात, गहू (बागायत), रब्बी ज्वारी ( बागायत व जिरायत ), हरभरा.

गळित धान्य: उन्हाळी भुईमुग,

नगदी पिके: रब्बी कांदा.

सहभागी शेतकरी :

अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक राहील.

प्रधानमंत्री शेतकरी विमा

नैसर्गिक आपदांमुळे कृषी क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग इत्यादींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळत नाही. यामुळे  शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पिकासाठी विमा काढण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला . या प्रधानमंत्री पीक विम्याचा  लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम द्यावी लागत होती. मात्र, आता तर राज्य शासनाने केवळ 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.

प्रधानमंत्री पीक योजनेची उद्द‍िष्ट्ये

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे कृषी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखम शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषिक्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.

Web Title: The deadline for taking prime ministers crop insurance during rabi season is december 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 08:33 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
1

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
2

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
3

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

School Holidays : ऑक्टोबरमध्ये शाळा किती दिवस बंद राहणार ? पालक – विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
4

School Holidays : ऑक्टोबरमध्ये शाळा किती दिवस बंद राहणार ? पालक – विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.