Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG संकटावर सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’! आता काही मिनिटांत मिळवा गॅस सिलेंडर, जाणून घ्या सविस्तर

भारतातही LPG चा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने LPG उत्पादन वाढवलं आणि आयातीत विविधता आणत वेगवेगळ्या उपाययोजना करत परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखली आहे. आताही या परिस्थितीवर आणखी एक उपाय सरकारने शोधून काढला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 06, 2026 | 03:50 PM
गॅस टंचाईचा असाही बसतोय फटका; लग्न सोहळे होईना नियोजित वेळेत

गॅस टंचाईचा असाही बसतोय फटका; लग्न सोहळे होईना नियोजित वेळेत

Follow Us
Follow Us:
  • LPG संकटावर सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’!
  • ५-किलोग्रामचे छोटे LPG सिलिंडर
  •  कसे मिळवायचे हे सिलेंडर?
LPG Crisis : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता पाचव्या आठवड्यात पोहोचलं आहे. सध्याच्या घडीला ते कधी संपेल याबाबत निश्चित अशी काही चिन्ह तर दिसत नाही आहेत. त्यात रविवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली, ज्यामुळे त्यांच्यातील तणावाची परिस्थिती आणखीनच वाढली आहे. Hormuz Starit मधील तणाव कमी होण्याची अशा आता मावळली आहे. त्यामुळे जगभरातील तेल आणि वायूचं संकट आणखीनच तीव्र होत आहे. भारतातही LPG चा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने LPG उत्पादन वाढवलं आणि आयातीत विविधता आणत वेगवेगळ्या उपाययोजना करत परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखली आहे. आताही या परिस्थितीवर आणखी एक उपाय सरकारने शोधून काढला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्याचं प्लॅनिंग करा, Flipkart उचलणार तुमच्या विमान प्रवासाचा खर्च! काय आहे ऑफर?

५-किलोग्रामचे छोटे LPG सिलिंडर

जागतिक परिस्थिती विस्कळीत असताना LPG गॅस एजन्सींबाहेर लांबच लांब रांगा लागत होत्या तेव्हा सरकारने स्पष्ट केले आहे की भारताकडे पुरेसा साठा आहे त्यामुळे घाबरुन खरेदी करण्याची गरज नाही. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. आता जागतिक स्थरावरील परिस्थिती निवळलेली नसतानाही भारतातील LPG च्या संकटावर उपाययोजना म्हणून, सरकारने मागणी पूर्ण करण्यासाठी ५-किलोग्राम एलपीजी सिलिंडरचा पुरवठा वाढवला आहे ५-किलोग्रामचे छोटे LPG सिलिंडर LPG डीलर्सकडे थेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यांची विक्री सातत्याने वाढत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की, २३ मार्चपासून देशात अंदाजे ६.६ लाख सिलिंडर विकले गेले आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अनुदानित १४.२-किलोग्रामच्या घरगुती सिलिंडरच्या विपरीत, या ५-किलोग्रामच्या एलपीजी बाटल्यांना एफटीएल सिलिंडर म्हटले जाते. ते बाजारभावाने उपलब्ध असून कोणत्याही जवळच्या गॅस विक्रेत्याकडून खरेदी करता येतात.

कसे मिळवायचे हे सिलेंडर?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे छोटे सिलिंडर खरेदी करण्यासाठी पत्त्याचा कोणताही पुरावा दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक वैध ओळखपत्र लागेल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. LPG ची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने या सिलिंडरचा पुरवठा वाढवला आहे.

साठेबाजीविरोधात सरकारी कारवाई:

शनिवारी सकाळी, सरकारने एक निवेदन जारी करून लोकांना पेट्रोल, डिझेल आणि LPG ची घाबरून खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोलियम उत्पादने आणि स्वयंपाकाच्या गॅसची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार सक्रिय पावले उचलत आहे.
याव्यतिरिक्त, तेल आणि LPG ची साठेबाजी आणि काळाबाजार यांविरुद्धची कारवाई सुरू आहे. ३,७०० हून अधिक छापे टाकण्यात आले असून LPG वितरकांना जवळपास १,००० कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे, तर आतापर्यंत ३६ डीलर्सना निलंबित करण्यात आलं आहे.

‘रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत’

सरकारने स्पष्ट केले आहे की घरगुती आणि वाहतुकीसाठी पूर्ण पुरवठा कायम ठेवला जात आहे, तर येणाऱ्या LNG कार्गोच्या मदतीने ६ एप्रिलपासून खत कारखान्यांना होणारा पुरवठा सरासरी वापराच्या सुमारे ९० टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प कच्च्या तेलाच्या पुरेसे साठे उपलब्ध असताना पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत आणि देशभरातील पेट्रोल पंप पूर्णपणे साठ्याने भरलेले आहेत.

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा शेअर बाजारावर परिणाम! गुंतवणूकदारांसाठी कुठे दडली संधी? जाणून घ्या

Web Title: The governments masterstroke to resolve the lpg crisis now get a gas cylinder in just minutesfind out the full details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Business News
  • Government
  • LPG
  • LPG Crisis
  • LPG gas cylinder
  • LPG price
  • LPG Shortage
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
3

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.