(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Flipkart आणि Air India यांच्यातील अलीकडील भागीदारीमुळे, तुम्ही आता Flipkart वर खरेदी करून मिळवलेले ‘SuperCoins’ हे Air India च्या ‘Maharaja Club Points’ मध्ये रूपांतरित करू शकता. या दोन कंपन्यांमधील भागीदारीच्या माध्यमातून, कोणताही Flipkart सदस्य आपले ‘SuperCoins’ हे ‘Maharaja Club’ मध्ये ५:२ या प्रमाणात हस्तांतरित करू शकतो. याचा अर्थ असा की, प्रत्येक ५ Flipkart SuperCoins च्या बदल्यात तुम्हाला २ ‘Maharaja Points’ मिळतील. SuperCoins चे Maharaja Points मध्ये रूपांतर करण्यासाठी, तुमच्याकडे किमान ५० SuperCoins शिल्लक असणं आवश्यक आहे. तुम्ही हस्तांतरित केलेले हे पॉइंट्स १९३ कामकाजाच्या दिवसांच्या आत तुमच्या Maharaja Club खात्यामध्ये जमा झालेले दिसतील. एकदा का Maharaja Club खात्यामध्ये जमा झाले, की या Maharaja Points चे पुन्हा Flipkart SuperCoins मध्ये रूपांतर करता येत नाही.
‘Maharaja Club’ आपल्या सदस्यांना, Air India आणि Star Alliance या पार्टनर एअरलाईंन्सवर फ्लाईट बुक करताना ‘महाराजा पॉइंट्स’ मिळवण्याची संधी उपलब्ध करून देतो. कोणताही सदस्य या ‘Maharaja Points’चा वापर करून, Air Indiaआणि तिच्या ‘Star Alliance’ भागीदार विमान कंपन्यांवर Award Flights बुक करू शकता.
‘Maharaja Club’ हा Air Indiaचा ‘फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्राम’ (FFP) आहे, जो प्रवाशांना ‘अवॉर्ड सीट्स’ म्हणजेच बक्षीस म्हणून मिळणाऱ्या जागा , ‘कॅबिन अपग्रेड्स’ आणि अशा अनेक प्रकारचे rewards देतो. ३० मार्च २०२६ पासून ने Flipkart SuperCoins ला आपला ‘पॉइंट्स कन्वर्ज़न पार्टनर ‘ म्हणून समाविष्ट केल्याची घोषणा करण्यात आली. या भागीदारी अंतर्गत, फ्लिपकार्टचा कोणताही सदस्य आपले सुपरकॉइन्स ५:२ या रेशोने आपल्या महाराजा क्लब खात्यामध्ये ट्रांसफर करू शकतो. याचा अर्थ असा की, ५ फ्लिपकार्ट सुपरकॉइन्सचे रूपांतर २ ‘महाराजा पॉइंट्स’मध्ये केले जाऊ शकतं.
पॉइंट्सचे Maharaja points मध्ये रूपांतर करण्यासाठी, सदस्याकडे किमान ५० Flipkart SuperCoins असणे आवश्यक आहे. एकदा का Maharaja Club खात्यामध्ये जमा झाले, की या Maharaja pointsचे रूपांतर पुन्हा Flipkart SuperCoinsमध्ये करता येत नाही. या पॉइंट्सचा वापर विमान तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी, लाउंजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, ‘इकॉनॉमी क्लास’मधून ‘बिझनेस क्लास’मध्ये अपग्रेड करण्यासाठी आणि अतिरिक्त सामानाची सवलत म्हणजेच extra baggage allowance मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.
अगोदर Flipkart ॲप ओपन करा, ‘Categories’मध्ये जा आणि ‘SuperCoins’ हा पर्याय निवडा.
‘SuperCoin Partners’ हा पर्याय निवडा आणि ‘Air India Maharaja Club’ शोधा.
तुमच्या Maharaja Club ID चा वापर करून तुमचे Maharaja Club खातं त्यात Link करा.
तुम्हाला ट्रान्सफर करायचे असलेल्या SuperCoins ची संख्या त्यात निवडा आणि पुढे प्रोसेस करा.
तुमचे Maharaja Points तुमच्या खात्यात जमा केले जातील.






