Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toranmal Tourism : तोरणमाळ बनणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ! ‘सह्याद्री’वर बैठकीत मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा

Toranmal Tourism : नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण 'तोरणमाळ'चा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करून त्याला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवले जाईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 05, 2026 | 07:47 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तोरणमाळ बनणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ!
  • ‘सह्याद्री’वर बैठकीत मोठा निर्णय
  • पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा
Toranmal Tourism : तोरणमाळचा पर्यटन विकास ( Toranmal Tourism ) शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करताना तेथील नैसर्गिक वारसा जपत पर्यटकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर राहील, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड जगात पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रसिद्धीवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश

आढावा बैठकीत यांची हजेरी

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याबाबत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा बैठक पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे (भा.प्र.से.), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भा.प्र.से.), पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.), पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता आकाश चकोर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे नंदुरबार जिल्हाधिकारी, नाशिक पर्यटन विभागाचे उपसंचालक आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

११ हेक्टर ५६ आर जागेची तातडीने मोजणी

बैठकीत तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तोरणमाळचा पर्यटन विकास नियोजनबद्ध, शाश्वत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीच्या ११ हेक्टर ५६ आर जागेची तातडीने मोजणी करून तिची चतुःसीमा निश्चित करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी आवश्यक पाठपुरावा करून संबंधित जागेचे नकाशे व चतुःसीमा एका महिन्याच्या आत निश्चित करावेत, असे निर्देशही पर्यटन मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

वैशिष्ट्यपूर्ण वारसा जपावा

तोरणमाळचा नैसर्गिक, जैववैविध्यपूर्ण आणि पर्यटनदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वारसा जपत आधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक विकास, पर्यटन पायाभूत सुविधा आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध घटकांचा समावेश पर्यटन विकास आराखड्यात करण्यात यावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणारा प्रस्ताव सर्वंकष, परिणामकारक आणि भविष्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सक्षम असावा, यावरही बैठकीत भर देण्यात आला.

CIBIL Score Drop : लोनचा हप्ता भरायचा राहून गेला? घाबरू नका! ‘इतक्या’ दिवसांनंतरच सिबिल स्कोअरवर होतो परिणाम

Web Title: Toranmal tourism to be develop as world class tourist destination shambhuraj desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Best Tourism Village
  • indian tourism
  • Nandurbar News
  • Shambhuraj Desai
  • tourism
  • Tourism Places

संबंधित बातम्या

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
1

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
2

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
3

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
4

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.