Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Debt Crisis: अमेरिकेचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्स पार, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती ओझं?

US Debt Crisis: जगातील सर्वाधिक इकॉनॉमी असणारा देश अमेरिका पहिल्यांदाच ४० ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जात बुडाला आहे. हे कर्ज वेगाने वाढत असून सरकार रोज ३.८ अरब डॉलर्स कर्जापोटी खर्च करत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 20, 2026 | 10:36 AM
US Debt Crisis: अमेरिकेवर वाढतोय कर्जाचा बोजा (फोटो सौजन्य - ChatGPT)

US Debt Crisis: अमेरिकेवर वाढतोय कर्जाचा बोजा (फोटो सौजन्य - ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • इतिहासात पहिल्यांदा अमेरिका ४० ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जाखाली 
  • देशाच्या कर्जात २०२० पासून १७ ट्रिलियन डॉलरने आणि २००८ पासून ३० ट्रिलियन डॉलरने वाढ झाली आहे
  • आता देशातील प्रत्येक व्यक्तीवर साधारणतः ११९,६९९ डॉर्लर्सचे कर्ज 
  • रोज व्याज चुकविण्यासाठी सरकार खर्च करत आहे तब्बल ३.८ अरब डॉलर्स 
US Debt Crisis: अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे दिवाळे निघाले आहे. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेने कर्जाच्या बाबतीत ४० ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे.  २०२० पासून त्यात १७ ट्रिलियन डॉलर्स आणि २००८ पासून ३० ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली असल्याचे आता समोर आले आहे. केवळ व्याजापोटीच दररोज ३.८ अब्ज डॉलर्सचा खर्च येत आहे. तज्ज्ञांच्या मते, याचे परिणाम भविष्यात व्यक्ती, कंपन्या आणि सरकारला भोगावे लागतील. देशातील प्रत्येक व्यक्तीवर सध्या तब्बल १,१९,६९९ डॉलर्सचे कर्ज आहे.

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला अमेरिका देश पूर्वीपासूनच मोठ्या कर्जबाजारीपणाखाली आहे, परंतु अलीकडील घडामोडींमुळे अर्थसंकल्प आणि वित्तीय बाजारपेठेतील तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे. अलिकडच्या वर्षांत कर्जात मोठी वाढ झाली आहे. वाढते व्याजदर आणि कर्जवाढीमुळे कर्जावरील व्याजाची मोठी रक्कम भरावी लागत आहे. सर्वात मोठी चिंता ही आहे की, जेव्हा अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे, अशा वेळी देशाचे कर्ज वाढत आहे.

अमेरिकन नागरिकांवर कर्जाचा वाढता बोजा; ट्रम्पच्या ‘अमेरिका फर्स्ट’च्या घोषणेचा काय फायदा?

अमेरिकेचे कर्ज का वाढत आहे?

CNN च्या एका अहवालानुसार, ‘पीटर जी. पीटरसन फाउंडेशन’ या आर्थिक देखरेख संस्थेचे सीईओ मायकल पीटरसन यांनी म्हटले आहे की, जर सध्याचा कल असाच सुरू राहिला, तर अमेरिकेचे कर्ज केवळ सहा वर्षांत ५० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. त्यांनी पुढे असेही सांगितले की, १० वर्षांपेक्षा कमी काळापूर्वी हे कर्ज २० ट्रिलियन डॉलर्सवर होते. अमेरिका खरोखरच आपली अर्थव्यवस्था आणि राष्ट्राचे भविष्य धोक्यात घालत आहे.

अमेरिकेच्या कर्जभारात झपाट्याने वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे देशाच्या लोकसंख्येचे वाढते वय. दररोज अंदाजे १०,००० ‘बेबी बूमर्स’ निवृत्त होत आहेत. १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेल्यांना ‘बेबी बूमर्स’ म्हटले जाते. याव्यतिरिक्त, अमेरिकेची लोकसंख्या वाढली आहे. याचा अर्थ असा की, सरकार सामाजिक सुरक्षा (Social Security) आणि मेडिकेअरवर (Medicare) पूर्वीपेक्षा जास्त खर्च करत आहे.

कर्ज सेवा खर्च सर्वाधिक आहे

अमेरिकन सरकार आता व्याजाच्या देयकांवर दररोज ३.८ अब्ज डॉलर्स खर्च करत आहे. असा अंदाज आहे की २०२८ पर्यंत, अमेरिका व्याजावर दररोज अंदाजे ५ अब्ज डॉलर्स खर्च करेल, जो इतर कोणत्याही खर्चापेक्षा जास्त असेल. अमेरिका सध्या मेडिकेअरवर दररोज ३.१ अब्ज डॉलर्स आणि संरक्षणावर २.५ अब्ज डॉलर्स खर्च करते. याचा अर्थ असा की, मेडिकेअर आणि संरक्षणापेक्षा कर्जाच्या व्याजाच्या देयकांवर जास्त खर्च होत आहे.

अमेरिका कर्जाच्या विळख्यात, वाचा… कितीये भारतावरील कर्ज? 7 वर्षात कर्जात 98.65 टक्क्यांनी वाढ!

Web Title: Us debt crisis reached 40 trillion dollars first time in history how it impacts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • America news
  • Business News
  • US News

संबंधित बातम्या

Kinder Happiness Times Diwali Gift : यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू
1

Kinder Happiness Times Diwali Gift : यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
2

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
3

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता
4

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.