
Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
इरिना ही मूळची परदेशी मॉडेल आहे, पण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमुळे ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती झाली. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आहे. त्या व्हिडिओत तिच्या रिक्षा ड्रायव्हरला एका कारवाल्याने मारहाण केल्याचं दिसतं आहे. Irene Rudakova Video:
इरिना रिक्षात बसून जात होती. अचानक एका कारमधून एक माणूस उतरला आणि थेट रिक्षा ड्रायव्हरच्या अंगावर आला. त्याने ड्रायव्हरच्या शर्टाची कॉलर पकडली आणि त्याला बाहेर ओढायला लागला. शिव्या देऊ लागला. व्हिडिओत तो माणूस म्हणतोय की मी तुला इथेच मारेन. तो रिक्षावाला बिचारा घाबरला होता. त्याची काहीच चूक नसताना हात जोडून तो माफी मागत होता.परंतू त्या कार चालकांची अरेरावी वाढत गेली. त्यांचे असे म्हणणं होतं की, रिक्षाने त्याच्या कारला धक्का मारला. पण इरिनाने सर्व सत्य बाहेर आणलं. ती बसलेल्या रिक्षाने कारला कुठलाच धक्का लागला नव्हता.
R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
ती व्हिडिओमध्ये म्हणते की, मी रिक्षातच बसले होते, धक्का लागला असता तर मला नक्की जाणवलं असतं. असा काहीच धक्का लागला नव्हता. नियम तर त्या कारवाल्यानेच मोडला होता आणि वर तोच दादागिरी करतोय. मला तुमचा सपोर्ट हवा आहे. मुंबईत हे असं गरीब लोकांवर अन्याय करणं थांबलं पाहिजे. काहीही कारण नसताना त्याने इतका तमाशा केला. त्या रिक्षावाल्याची काय चूक होती? त्याला हात लावायचा अधिकार त्याला कोणी दिला? जर तुमची कोणत्या पोलीस अधिकाराची ओळख असेल तर प्लीज मदत करा. मी घाबरले नाही, माझी किंवा माझ्या रिक्षावाल्याची काहीच चूक नसून त्याला उगाच मारलं गेलं.
इरिना रुडाकोवा ही रशियाची आहे. पण ती भारतातच राहते. शाहरुख खान, अक्षय कुमारच्या सिनेमात ती बॅकग्राउंड डान्सर म्हणून पण दिसली आहे. आयपीएलमध्ये ती सनरायझर्स हैदराबाद टीमची चीयर लीडर पण होती. पण बिग बॉस मराठीमध्ये ती आल्यावर तिचं मराठीवरचं प्रेम बघून सगळेच तिचे फॅन झाले.आता तिने हा व्हिडिओ टाकल्यामुळे लोक त्या कारवाल्यावर खूप संतापले आहेत. मुंबईत गरीब माणसाला असं वागणूक देणं चुकीचं आहे, अशा कमेंट्स येत आहेत.