Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuzya Ayla Song Release: ‘बागड बागड…’ म्हणत पुन्हा बालपणात घेऊन जाणार! सुजय डहाके यांच्या सिनेमातील गाणं रिलीज

Tuzya Ayla Song Release: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’ या चित्रपटातील महत्त्वपूर्ण ‘बागड बागड…’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, सुमधूर संगीत आणि मनाला भिडणारे सूर यामुळे हे गाणे खास ठरत आहे. पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या धोरणात्मक भागीदारीतून चित्

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 05, 2026 | 11:14 AM
Tuzya Ayla Song Release: ‘बागड बागड…’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Tuzya Ayla Song Release: ‘बागड बागड…’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘तुझ्या आयला’मधील ‘बागड बागड…’ गाणे रिलीज
  • अवधूत गुप्ते यांच्या आवाजात, मंदार चोळकर यांचे गीत
  • सुजय डहाके यांचा चित्रपट २५ सप्टेंबरला प्रदर्शित
 

नेहमी प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटांद्वारे विविधांगी विषय रसिकांसमोर सादर करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके आहेत.  दिग्दर्शन तसेच पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या धोरणात्मक भागीदारी अंतर्गत निर्मिती या चित्रपटाला लाभली आहे. या चित्रपटातील ‘बागड बागड…’ हे महत्त्वपूर्ण गाणे रसिक दरबारी सादर झाले आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, सुमधूर संगीत, लयबद्ध चाल आणि मनाला भिडणारे सूर यांचा संगम या गाण्यात जाणवतो. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

झी म्युझिक अंतर्गत सादर

चित्रपटाच्या कथेला गती प्रदान करण्यासाठी गाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘तुझ्या आयला’ या चित्रपटातील ‘बागड बागड…’ हे गाणेही कथानकात अतिशय महत्त्वाच्या वळणावर येते. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलेले ‘बागड बागड…’ हे गाणे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून आकाराला आले आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे संगीतकार वरुण लिखते यांनी या गाण्याला संगीतसाज चढवला आहे. ‘बागड बागड…’ हे गाणे झी म्युझिक अंतर्गत सादर करण्यात आले आहे. Tuzya Ayla Song Release:

हे चार अतिशय महत्त्वाचे शब्द

किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचा ठाव यात घेण्यात आला आहे. ‘जिथं जिथं गेलास तू, उमटला तुझा ठसा…’ असा मुखडा असलेल्या या गाण्यात शालेय जीवनातील खेळ, धमाल, मजा, मस्ती, दंगा, भटकंती, भांडणे, हाणामाऱ्या, मैत्री, दुरावा, आपलेपणा यांची झलक पाहायला मिळते. थकल्या-भागल्या मनाला उभारी देण्याचे काम करणारे हे गाणे ‘तुझ्या आयला’च्या कथानकात एका अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी येते आणि चित्रपटाला गती प्रदान करते. प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्यामध्ये ‘तुझ्या आयला’ या खेळाची झलकही पाहायला मिळते.

Suraj Chavan: ‘सूरज चव्हाण झाला बाबा!’ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

वास्तवदर्शी लोकेशनवर नैसर्गिक प्रकाशात चित्रीत केलेले हे गाणे नेत्रसुखद वाटते. ‘उनाड दुपारी बागड बागड…’ हे या गाण्याची पंचलाईन आहे. या गाण्यातील हे चार अतिशय महत्त्वाचे शब्द प्रत्येकाला बालपणी दुपारच्या भर उन्हात केलेल्या भटकंतीची आठवण करून देणारे आहेत. अवधूत गुप्ते यांनी अतिशय ठसकेबाज तालामध्ये या गाण्यातील शब्दांना न्याय दिला आहे. वरुण लिखते यांच्या सुमधूर संगीताची किनार लाभल्याने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.

चित्रपटाची निर्मिती

पॅनोरमा स्टुडिओजच्या वतीने कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलच्या वतीने सुनील जैन, आदित्य जोशी, तर प्रकाश फिल्म्सच्या वतीने राजेश सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुशांत वेंगुर्लेकर, मोहित अरोरा आणि मेघना प्रमाणिक सहनिर्माते आहेत. या चित्रपटात राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्या प्रमुख भूमिका असून, अनेक गुणी बालकलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Marathi Serial : कृष्णजन्माचा जल्लोष गुन्हेगारांचा हाहाकार! साक्षात ब्रह्मांडनायकाच्या अपहरणाने अक्कलकोट हादरणार!

Web Title: Bagad bagad song released ahead of september 25 release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक अंत! 4-5 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, बेडभोवती रक्ताचे डाग अन्…
1

प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक अंत! 4-5 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, बेडभोवती रक्ताचे डाग अन्…

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
2

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार
3

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
4

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.