
प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक अंत!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
त्याच्या घरातून अतिशय घाण वास यायला लागला. दोन-तीन दिवसांपासून शेजाऱ्यांना दुर्गंधी येत होती. काय झालंय बघण्यासाठी गेले तर दार आतून बंद होतं. काहीतरी गडबड आहे असं वाटून शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी दार तोडलं आणि आत बघितलं तर धक्काच बसला. बलजीत सिंग यांचा मृतदेह बेडवर पडलेला होता. मृतदेहाची अवस्था खूपच वाईट होती, कुजायला लागला होता. पोलिसांचं दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मृत्यू 4 ते 5 दिवस आधीच झाला असावा. घरात काही ठिकाणी रक्ताचे डाग पण होते, त्यामुळे सुरुवातीला ही हत्या तर नाही ना असा संशय असल्याने पोलिसांनी संपूर्ण तपास केला. घरात काही पुरावे मिळतात ते पाहिले. आजूबाजूचे CCTV फुटेज सुद्धा तपासले केले आहेत.
गेल्या काही दिवसात बलजीत सिंग हा कोण भेटत नव्हता त्यामुळे मृत्यूचे नेमकं कारण काय आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर समजेल. मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह सरकारी दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सुरुवातीच्या मेडिकल रिपोर्टनुसार त्याला मोठा हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सध्या घातपाताची शक्यता नाही असं म्हटलं आहे, पण मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यामुळे ते सगळ्या बाजूने तपास करत आहेत.
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…
काही दिवसांपूर्वी अशीच हत्या एका गायकाची झाली होती. हरियाणातील गायक अंकित बालियानला जिमच्या बाहेर 20 गोळ्या घालून मारलं होतं. दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. एकापाठोपाठ एक गायकांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
Nashik News: नाशिकच्या आश्रमशाळेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; ताप-उलटीनंतर अचानक प्रकृती खालावली
नाशिक: आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर येत असतानाच नाशिकमध्ये आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसरवाडी परिसरातील आश्रमशाळेत ही घटना घडली. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
Nashik News: नाशिकच्या आश्रमशाळेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; ताप-उलटीनंतर अचानक प्रकृती खालावली