Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vikram Solar चा तामिळनाडूमध्ये नवा मेगा प्लांट, पहिल्या सोलर मॉड्युलचे यशस्वी उत्पादन; 1500 जणांना मिळणार रोजगार

विक्रम सोलरने तामिळनाडूतील गंगैकोंडन येथे नवीन प्रोजेक्ट सुरु केला आहे. या आपल्या नवीन मेगा कारखान्यातून पहिल्या सौर मॉड्यूलचे यशस्वीरित्या उत्पादन सुरु केलं आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या रोजगारासह बऱ्याच गोष्टींचा फायदा होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 06:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Vikram Solar चा मोठा धमाका!
  • तामिळनाडूतील नवीन मेगा प्रकल्प
  • पहिल्या सोलर मॉड्युलचे यशस्वी उत्पादन
भारतातील आघाडीच्या सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी एक असलेल्या विक्रम सोलरने आज तामिळनाडूतील गंगैकोंडन येथे आपल्या नव्या उत्पादन प्रकल्पाच्या औपचारिक उदघाटनाची घोषणा केली आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या सौर मॉड्यूलचे यशस्वीरित्या उत्पादनही करण्यात आले आहे. गेल्या दोन दशकात, विक्रम सोलरने भारतातील सौर मॉड्यूल उत्पादनातील सर्वात विश्वसनीय कंपन्यांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक नवीन प्रकल्पाच्या उभारणीसोबत आपल्या तांत्रिक क्षमतेचा विस्तारसुध्दा केला आहे.

इंडोनेशियाला जायचा प्लॅन करताय? मग टेन्शन मिटलं! तिथेही फक्त QR कोड स्कॅन करा अन् UPI ने करा पेमेंट

विक्रम सोलरच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा

तमिळनाडूतील वल्लम प्रकल्पाच्या अलीकडील यशानंतर, गंगैकोंडन येथील ही नवी सुविधा या प्रगतीचे पुढील पाऊल दर्शवते. हा प्रकल्प स्वयंचलित यंत्रणा आणि स्मार्ट उत्पादन प्रक्रियेवर आधारित आहे. तसेच, सेल, वेफर आणि इनगॉट निर्मितीमधील कंपनीच्या नियोजित विविधांगी एकत्रीकरणासाठी हा प्रकल्प पाया रचला आहे. हा तामिळनाडूतील कंपनीचा नवीन उत्पादन प्रकल्प असून तो विक्रम सोलरच्या विस्ताराच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यासोबतच, भारताची देशांतर्गत सौर उत्पादन क्षमता मजबूत करण्याप्रती असलेली आपली कटिबद्धता कंपनीने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना

तब्बल सहा लाख चौरस फुटांवर पसरलेल्या या नवनिर्मित मॉड्युल निर्मिती कारखान्यामुळे १,५०० हून अधिक कुशल व्यावसायिकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. ही गुंतवणूक भारताच्या स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्राचा विस्तार करण्यासोबतच प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारे एक मोठे पाऊल आहे. हा कारखाना मॉड्युल निर्मितीच्या आधुनिक मानकांनुसार उभारलेला असून तो उच्च स्वयंचलित प्रकल्प आहे. भविष्याचा वेध घेणारा हा स्मार्ट कारखाना असून तो कार्यक्षमता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी प्रगत स्वयंचलित तंत्रज्ञान आणि डिजिटल उत्पादन तंत्रज्ञान यांचा मिलाफ घडवून आणतो.

ग्राहकांना सातत्याने उच्च दर्जाची उत्पादन

उत्पादन सुरु असताना वे‌ळोवेळी देखभालीपासून ते प्रत्येक टप्प्यावरील स्वयंचलित गुणवत्ता तपासणीपर्यंत, ही अत्याधुनिक सुविधा मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक अचूकता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सौर मॉड्यूल दशकानुदशके विश्वसनीयपणे काम करेल, ही खात्री मिळते. येथील मुख्य वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण उत्पादन प्रक्रियेचे क्षणोक्षणी निरीक्षण, उत्पादित केलेल्या प्रत्येक सौर मॉड्यूलचा संपूर्ण माग ठेवणे, दोष अधिक अचूकतेने शोधणारी स्वयंचलित तपासणी यंत्रणा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यांवर स्वयंचलित हाताळणी यांचा समावेश आहे. ग्राहकांना सातत्याने उच्च दर्जाची उत्पादने मिळतील, याची खात्री करण्यासाठी हा प्रकल्प मॉड्यूल्सच्या कामगिरीच्या आधारे त्यांचे स्वयंचलितपणे वर्गीकरण, सॉर्टिंग आणि पॅकेजिंग करण्यासाठी स्मार्ट प्रणालीचा वापर करतो.

पुरवठा साखळी अधिक मजबूत होणार

सदर प्रकल्पामध्ये उत्पादित करण्यात आलेली हायपरसोल एन-टाइप टॉपकॉन जी१२आर मॉड्यूल्स हे विक्रम सोलरचे पहिले उत्पादन आहे. ते २३.६९ टक्क्यांपर्यंतच्या मॉड्यूल कार्यक्षमतेसह ६१५-६४० डब्ल्यूपी श्रेणीपर्यंतची ऊर्जा प्रदान करते.
गंगैकोंडन प्रकल्प हा भारतातील एक पूर्णपणे एकात्मिक सौर उत्पादन परिसंस्था उभारण्याच्या विक्रम सोलरच्या दीर्घकालीन उद्दिष्टाचा मुख्य आधारस्तंभ आहे. आगामी काही वर्षांत, या प्रकल्पामध्ये टप्प्याटप्प्याने मॉड्युल, सेल, वेफर आणि इनगॉट निर्मितीचे प्रकल्प सुरू केले जातील आणि त्यामुळे सौर क्षेत्राची संपूर्ण मूल्य साखळी एकाच छताखाली येईल. या एकात्मिक संरचनेमुळे पुरवठा साखळी अधिक मजबूत होणार आहे. तसेच उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण सुधारेल आणि वाहतूक आणि इतर आनुषंगिक खर्च कमी होतील.

याचबरोबर देशांतर्गत मूल्यवृद्धी वाढेल. या आराखड्यांतर्गत विक्रम सोलरचे आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ९ गिगावॉट सौर सेल उत्पादन क्षमता स्थापित करण्याचे, आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत त्यात आणखी ३ गिगावॉटची भर घालण्याचे आणि आर्थिक वर्ष २०२९-३० पर्यंत १२ गिगावॉट वेफर आणि इनगॉट उत्पादन क्षमता जोडण्याचे उद्दीष्ट आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि स्वावलंबी सौर उत्पादन परिसंस्था उभारण्याची कंपनीची वचनबद्धता यातून आणखी बळकट होते.

बाजाराची मागणी लक्षात घेता उत्पादन क्षमता वाढवतोय – ज्ञानेश चौधरी

विक्रम सोलरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. ज्ञानेश चौधरी या नवीन प्रकल्पाबाबत माहिती देताना म्हणाले, “आमच्या गंगैकोंडन प्रकल्पातून पहिल्या सोलर मॉड्युलची निर्मिती होणे, हा विक्रम सोलरच्या वाढीच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात एकूण १० गिगावॉटपेक्षा जास्त सोलर मॉड्युल पुरवण्याचा टप्पा आम्ही पार केला आहे. बाजारातील प्रत्यक्ष मागणी लक्षात घेऊन आम्ही आमची उत्पादन क्षमता वाढवत आहोत. या प्रकल्पामध्ये टप्प्याटप्प्याने सोलर सेल, वेफर आणि इंगॉटचे उत्पादन सुरू करून आम्ही एकात्मिक उत्पादन विश्व साकारले आहे. हे व्यासपीठ भारताच्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या धोरणानुरुप साकारण्यात आलेले आहे आणि त्यामुळे देशाची पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल. तसेच देशांतर्गत मूल्यनिर्मिती वाढेल आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील उद्दिष्टांना बळ मिळणार आहे. हा केवळ एक नवीन प्रकल्प नव्हे, तर भारतीय सोलर उत्पादन क्षेत्राच्या भविष्यातील एक मोठी गुंतवणूक आहे.”

EPFO Interest: 8 कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी… PF बॅलन्स वाढणार, खात्यात जमा होणार व्याजाची रक्कम

Web Title: Vikram solar mega plant tamil nadu first solar module employment to 1500 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • solar energy
  • Solar Panel
  • solar power
  • Solar Project

संबंधित बातम्या

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
1

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी
2

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?
3

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?

US Debt Crisis: अमेरिकेचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्स पार, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती ओझं?
4

US Debt Crisis: अमेरिकेचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्स पार, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती ओझं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.