Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis in WEF Davos: तब्बल ‘इतक्या’ कोटींचा करार एका वर्षात उत्पादनात; मुख्यमंत्री फडणवीसांचे भरत गीते यांचे कौतुक

दावोस येथील WEF मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक भरत गीते यांचे एका वर्षाच्या आत ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले, ज्यामुळे 'मेक इन इंडिया'च्या उद्दिष्टांना चालना मिळाली.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 21, 2026 | 01:22 PM
Devendra Fadnavis in WEF Davos: तब्बल 'इतक्या' कोटींचा करार एका वर्षात उत्पादनात; मुख्यमंत्री फडणवीसांचे भरत गीते यांचे कौतुक

Devendra Fadnavis in WEF Davos: तब्बल 'इतक्या' कोटींचा करार एका वर्षात उत्पादनात; मुख्यमंत्री फडणवीसांचे भरत गीते यांचे कौतुक

Follow Us
Close
Follow Us:
  • ५०० कोटींचा प्रकल्प वर्षभरात आला प्रत्यक्षात
  • भरत गीते यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
  • मराठी उद्योजकांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार
 

Devendra Fadnavis in WEF Davos: दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि भरत गीते यांच्यातील संवादावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान उद्योग उभारणीतील नियोजन, वेगवान अंमलबजावणी, प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय तसेच उत्पादन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या उपक्रमांतून कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाला आहे.

“जागतिक आर्थिक परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक भरत गीते यांनी अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. वर्षभरात उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

हेही वाचा: Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करत राज्यासमोर आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे.”

“सामंजस्य करार कागदापुरता न राहता एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होऊ शकतो, याचे भरत गीते आणि ‘तौरल इंडिया’ हे उत्तम उदाहरण आहे. मराठी उद्योजकांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य धोरणात्मक पाठबळ दिल्यास महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नवे शिखर गाठेल,” असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: Union Budget 2026: अर्थसंकल्प 2026 गृहनिर्माण मागणी आणि शहरी विकास टिकवण्यासाठी विकासकांकडून धोरणात्मक पाठिंब्याची मागणी

भरत गीते म्हणाले, “तौरल इंडियाने २०१६ पासून औद्योगिक विस्तार करत ऊर्जा क्षेत्र, संरक्षण उत्पादन, आरोग्य उपकरणे तसेच एरोस्पेस क्षेत्रासाठी आवश्यक अचूक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज निर्मितीत भरीव योगदान दिले आहे. विविध क्षेत्रांतील या योगदानामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बळ मिळत असून, आर्थिक वाढीस हातभार लागत आहे. उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असून, वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होईल,” असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

Web Title: Wef davos maharashtras 500 crore mou turns into manufacturing reality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

“महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे…”; दावोसमधून काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?
1

“महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे…”; दावोसमधून काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Davos Wef 2026: लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार, दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका
2

Davos Wef 2026: लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार, दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका

राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…
3

राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
4

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.