Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2030 पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 950 कोटींच्या प्रकल्पांना गती

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 950 कोटींच्या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2030 पर्यंत पुण्याला देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनवण्याचे उद्दिष्ट मांडत मेट्रो, रिंग रोड, डीप टेक आणि जीसीसी क्षेत्रातील मोठ्या विकास आराखड्याची माहिती दिली.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 09:40 PM
2030 पर्यंत पुणे देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 950 कोटींच्या प्रकल्पांना गती

2030 पर्यंत पुणे देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 950 कोटींच्या प्रकल्पांना गती

Follow Us
Follow Us:

पुणे, दि.१८ – पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतून शासनाला अनुक्रमे ५००, ३०० आणि १५० कोटी असा एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असेही ते म्हणाले.

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’

गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर, हडपसर – यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे‍ भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर व विशेषतः औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांवरील समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळणार आहे. भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा वेध घेत या तिन्ही उन्नत मार्गांवरून पुढील काळात मेट्रो नेण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

या उन्नत मार्गांवरच भविष्यात मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी आतापासूनच आवश्यक ती डिझाईन तयार केली आहे. यामुळे भविष्यात जेव्हा मेट्रोचे काम सुरू होईल, तेव्हा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व या एकत्रित रचनेमुळे मेट्रोच्या खर्चात किमान ४० टक्क्यांची बचत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नव्या पुरंदर विमानतळाशी जोडणी (कनेक्टिव्हिटी) वाढविण्यावरही शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिवेघाटामध्ये दुहेरी बोगदा तयार करून त्यातून रस्ता व मेट्रो नेल्यास पुरंदर विमानतळावर पोहोचण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल व विनाअडथळा प्रवास शक्य होईल, यादृष्टीने विचार सुरु आहे. या विमानतळासाठी ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले असून, देशाच्या इतिहासात इतक्या वेगाने भूसंपादन होण्याचा हा विक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच १७३ किलोमीटरचा बाह्य व ८६ किलोमीटरचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी

पुणे व पीएमआरडीए क्षेत्राच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या विकासाचा विचार करताना पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वाढती लोकसंख्या लक्षात घेता केवळ पाण्याचे नवे स्रोत शोधण्यावर अवलंबून न राहता, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर शासनाने भर दिला आहे. जायका व जागतिक बँकेच्या सहकार्याने अनेक जलशुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येत असून, नद्या व तलावांना प्रदूषित करणारे शहरी सांडपाणी शुद्ध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहे.

पुणे शहर हे अभियांत्रिकी व नवउद्यमांचे (स्टार्टअप) प्रमुख केंद्र असून पुढील काळात ते अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) व जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख हब बनेल. देशातील एकूण जीसीसीपैकी जवळपास ३५ टक्के केंद्र एकट्या पुण्यात उभी राहत आहेत. इतर शहरांसारखी पुण्याची वाहतूक कोंडीची अवस्था होऊ नये, यासाठी हे सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: Pune growth engine 2030 devendra fadnavis elevated road projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Governement
  • pune news

संबंधित बातम्या

‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली
1

‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’
2

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी
3

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी

Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन
4

Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.