Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली

कुमार सप्तर्षींच्या जाण्याने जेष्ठ समाजवादी विचारवंत, तसेच गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड हरवले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 09:30 PM
‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली
Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीस यांची सप्तर्षी यांना श्रद्धांजली
  • कुमार सप्तर्षी यांचे 85 व्या वर्षी निधन 
  • ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून लोकप्रिय
मुंबई: महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे निस्वार्थ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सप्तर्षींच्या जाण्याने जेष्ठ समाजवादी विचारवंत, तसेच गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड हरवले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  कुमार सप्तर्षी यांचे पुण्यात दु:खद निधन झाले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. सप्तर्षी  समाजाला दिशा देणारे विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान होते. ग्रामीण परिवर्तन, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि  तरुणांच्या मनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करण्याचे मोठे कार्य  केले. समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना त्यांनी नेहमीच सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचा आग्रह धरला. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने असंख्य कार्यकर्त्यांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा दिली.

डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाने ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी उभा केलेला वैचारिक वारसा आणि संघर्षाचा मार्ग पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आम्ही डॉ . सप्तर्षी परिवारासह, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन

रोहित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. आज समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना, द्वेष, हिंसा, आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे.

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा

विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांच्या माध्यमातून गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

Web Title: Cm devendra fadnavis tribute to dr kumar saparshi passed away in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Death
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’
1

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी
2

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी

Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन
3

Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन

शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार? तब्बल 73.52 कोटींच्या उड्डाणपुलाला हिरवा कंदील
4

शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार? तब्बल 73.52 कोटींच्या उड्डाणपुलाला हिरवा कंदील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.