Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामान्यांना लुबाडलं जातंय… कच्च तेल इतकं स्वस्त तरीही Petrol-Diesel महाग का? कधीपर्यंत कमी होणार भाव?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 30, 2026 | 04:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

जागतिक स्तरावर उलथापालथ सुरु असताना त्याचा सगळ्याच जास्त परिणाम कच्च्या तेलावर झाला आहे. त्याच्या किमती गगनाला भिडल्या. त्यामुळे संपूर्ण जगात महागाईचे वारे वाहून लागले. मुख्य म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून आला. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड १% पेक्षा जास्त घसरून ७२.४० डॉलर प्रति बॅरलवर आले. दरम्यान, डब्ल्यूटीआय क्रूड ०.८३% घसरून ७०.१६ डॉलर प्रति बॅरलवर आले.

बड्या उद्योगपतीच्या ‘त्या’ एका विधानाने खळबळ, IT हबला ‘कचऱ्याचं शहर’ म्हणून दिली उपमा, बंगळुरु शहराची अशी अवस्था का?

दोहा येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेत प्रगती झाल्याच्या वृत्तामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा पुरवठ्याचा धोका टळला आहे. यामुळे आज कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. पण कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही, देशात इंधनाच्या किमती स्थिर आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये पेट्रोल अजूनही १०० रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. डिझेलचे दरही ९५ ते ९९ रुपये प्रति लिटरच्या दरम्यान आहेत.

कंपन्या नफा कमावताहेत

अमेरिका-इराण तणाव आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळात तोटा सहन करणाऱ्या सरकारी तेल कंपन्या (OMCs) आता मोठा नफा कमवत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७२.४० डॉलरपर्यंत घसरल्याने, त्यांना पेट्रोल विक्रीवर प्रति लिटर ५ ते ७ रुपयांचा नफा मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे कंपन्यांचा नफा वाढेल.
दरम्यान, ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे इंधन विपणन मार्जिन मजबूत होत असल्याने सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या  नफ्यात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, वाढता कर्जाचा दबाव आणि भविष्यातील इंधन करांबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या दीर्घकालीन नफ्याच्या क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत.

गेल्या महिन्यात, मे महिन्यात, पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० ते १२० डॉलरपर्यंत पोहोचल्या होत्या. यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १२ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर २१ रुपयांचा मोठा तोटा झाला.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का कमी होत नाहीत?

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊनही, कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दीर्घकाळ स्थिर ठेवल्या होत्या. आता कंपन्या नफा कमावत असल्याने, त्या नफ्याचा वापर कर्ज आणि पूर्वीचे नुकसान कमी करण्यासाठी करत आहेत. कंपन्या कालचे तेल खरेदी करून आज विकत आहेत असे नाही; उलट, सध्या पंपावर उपलब्ध असलेले पेट्रोल जास्त दराने आयात केलेले असण्याची शक्यता आहे. जोपर्यंत स्वस्त कच्च्या तेलाचा नवीन साठा पुरवला जात नाही, तोपर्यंत किमती कमी होण्याची शक्यता नाही.

किमती किती काळ टिकतील?

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या मते, जर दोहा येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा यशस्वी झाली आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ प्रति बॅरल ७० डॉलरपेक्षा कमी राहिल्या, तर येत्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर २-३ रुपयांची घट होऊ शकते.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सांभळणार HDFC Bank ची धुरा? 3 वर्षांसाठी मिळाली जबाबदारी

Web Title: Why petrol diesel prices are high despite low crude oil rates india marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Business News
  • central goverment
  • petrol diesel
  • Petrol diesel price

संबंधित बातम्या

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
1

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
2

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
3

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.