जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणतीये... मतदान यंत्रांना हॅक करणे खुपच सोपे! वाचा... मस्क असे का म्हणालेत...
गेल्या काही काळापासून भारतात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एप्रिल ते जुन या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर उत्तरेकडील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यात. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची देखील घोषणा करण्यात आली आहे. तर तिकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेत देखील निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
बॅलेट पेपरचा वापर करण्याचे समर्थन
इलॉन मस्क यांनी निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाला पाहिजे, असे मत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी मांडले आहे. ते म्हणाले आहे की, मतदान यंत्र हॅक करणे खूपच सोपे आहे. त्यामुळे मस्क यांनी निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करण्याचे समर्थन केले आहे. याशिवाय त्यांनी मतदान यंत्राबाबतही मोठी गोष्ट सांगितली आहे. मस्क यांचे हे विधान अशा वेळी समोर आले आहे. जेव्हा भारतात मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
हे देखील वाचा – यंदाच्या दिवाळीत कमी भांडवलात करा ‘हे’ व्यवसाय; अल्पावधीतच होईल बक्कळ कमाई!
मीडीया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामधील एका टाऊन हॉलमध्ये बोलताना मस्क यांनी हे विधान केले आहे. मस्क यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नेहमीच मतदान यंत्रांबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे आता अमेरिकेतील राज्यांनी निवडणुकीत फक्त बॅलेट पेपरचा वापर करावा आणि हाताने मोजणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
ट्रम्प यांचे समर्थक आहेत इलॉन मस्क
इलॉन मस्क हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून उदयास आले आहेत. ट्रम्प यांच्या राजकीय कृती समितीला निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी 75 दशलक्ष डॉलर देणगी दिली आहे.
संगणक प्रोग्रामवर विश्वास ठेवू नका
भर भाषणात बोलाताना मस्क यांनी उपस्थितांना सांगितले आहे की, ‘मी एक तंत्रज्ञ आहे. मला संगणकाबद्दल बरीच माहिती आहे. मला वाटते की मी संगणक प्रोग्रामवर विश्वास ठेवणार नाही, कारण ते हॅक करणे खूप सोपे आहे.