ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. गेली अनेक वर्ष प्रशासक असल्यामुळे महासभा झाली नव्हती. त्यामुळे २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. नवनिर्वाचित निवडून आलेले नगरसेवक यांनी आपल्या प्रभागातील काही समस्या, लक्षवेधी महासभेत मांडणे अपेक्षित होते. परंतु तसे काही घडताना दिसले नाही. पालिका सचिव यांनी 19 लक्षवेधी अगदी ५-१० मिनिटांत वाचून अर्धवटच सभा तहकूब केली. त्यामुळे भाजप मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली पाहायला मिळाली. याचसंदर्भात नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी देखील आपली बाजू मांडली आहे.