Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET Exam 2025: ‘टीईटी’साठी विक्रमी प्रतिसाद! यंदा ४ लाख ७५ हजार विद्यार्थी, परीक्षार्थींच्या संख्येत दीड लाखांनी वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या १ लाख ४५ हजार ५९४ ने अधिक आहे. या परीक्षेला डी.एड. आणि बी.एड. धारकांसह कार्यरत शिक्षकही मोठ्या संख्येने बसणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 31, 2025 | 07:21 PM
'टीईटी'साठी विक्रमी प्रतिसाद! यंदा ४ लाख ७५ हजार विद्यार्थी (Photo Credit - X)

'टीईटी'साठी विक्रमी प्रतिसाद! यंदा ४ लाख ७५ हजार विद्यार्थी (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • टीईटीसाठी विक्रमी अर्ज!
  • ४ लाख ७५ हजार विद्यार्थी परीक्षेत
  • दीड लाखांनी वाढ

छत्रपती संभाजीनगर: राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षार्थ्यांची संख्या तब्बल दीड लाखांनी वाढून ४ लाख ७५ हजार ६६८ इतकी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या १ लाख ४५ हजार ५९४ ने अधिक आहे. या परीक्षेला डी.एड. आणि बी.एड. धारकांसह कार्यरत शिक्षकही मोठ्या संख्येने बसणार आहेत. नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे, पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक ठरल्याने शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले आहेत.

राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा होणार असून, १५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र निश्चिती, परीक्षार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था, सुरक्षा, तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.

यंदा प्राथमिक स्तरावरील ‘पेपर-१’ साठी २ लाख ३ हजार ३३३ आणि माध्यमिक स्तरावरील ‘पेपर-२’ साठी २ लाख ७२ हजार ३३५ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी ३ लाख ३० हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर यंदा हा आकडा पावणेपाच लाखांवर पोहोचला आहे.

‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी

जिल्ह्यातून २४,३८५ परीक्षार्थी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एकूण २४ हजार ३८५ परीक्षार्थी टीईटी देणार आहेत. परीक्षा दोन सत्रांमध्ये, शहरातील ३७ केंद्रांवर पार पडेल.

  • सकाळचे सत्र: सकाळी १०.३० ते दुपारी १.००

  • दुपारचे सत्र: दुपारी २.३० ते सायंकाळी ५.००

सकाळच्या सत्रात ११ हजार १३४, तर दुपारच्या सत्रात १३ हजार २५१ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा चार माध्यमांत घेतली जाणार असून, नियोजनासाठी ९ झोन तयार करण्यात आले आहेत.

तपशील माहिती
परीक्षेची तारीख २३ नोव्हेंबर २०२५
एकूण परीक्षार्थी २४,३८५
परीक्षा केंद्रे ३७ केंद्रे
सकाळचे सत्र स. १०:३० ते दु. १:०० (११,१३४ परीक्षार्थी)
दुपारचे सत्र दु. २:३० ते सायं. ५:०० (१३,२५१ परीक्षार्थी)
माध्यम चार माध्यमांत परीक्षा
नियोजन ९ झोन (४३ केंद्रसंचालक कार्यान्वयन करतील)

एकूण ४३ केंद्रसंचालक परीक्षेच्या यशस्वी पार पाडणीसाठी कार्यरत राहतील. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात बैठक घेऊन सर्व तयारी पूर्ण केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ तयारी पूर्ण; २४ हजार परीक्षार्थींसाठी २३ नोव्हेंबरला ३७ केंद्रांवर व्यवस्था

Web Title: 4 lakh 75 thousand students appear for tet this year increase in number of examinees by 1 5 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 07:21 PM

Topics:  

  • Career
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब; अवकाळी पावसामुळे पाणीसाठा ९७ टक्क्यांवर!
1

Chhatrapati Sambhajinagar: जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब; अवकाळी पावसामुळे पाणीसाठा ९७ टक्क्यांवर!

Chhatrapati Sambhajinagar News: मोबाईल क्रांतीचा फटका! छत्रपती संभाजीनगरमधील सिनेमागृहे ओस! अखेर शासनाने दिला ‘जीआर’चा आधार
2

Chhatrapati Sambhajinagar News: मोबाईल क्रांतीचा फटका! छत्रपती संभाजीनगरमधील सिनेमागृहे ओस! अखेर शासनाने दिला ‘जीआर’चा आधार

छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच ‘गोल्फ प्रीमियर लीग’! ३१ एकर जागेवर देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार
3

छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच ‘गोल्फ प्रीमियर लीग’! ३१ एकर जागेवर देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार

‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी
4

‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.