
बाळापूरच्या जि.प. शाळेचे विद्यार्थी बनले 'जिल्हा चॅम्पियन' (Photo Credit- X)
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेमध्ये विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे:
गुंजन श्रीकृष्ण सुलताने
अल्फिया फातेमा वहेदत शाह
कृष्णा गजानन सुशीर
अश्विन राजेश वानखडे
पियूष देवानंद बाभूळकर
महात्मा फुले स्मृतीदिनी या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गजधाणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला.
रोख बक्षीस आणि प्रोत्साहन
माजी विद्यार्थी संघाचा पुढाकारामुळे कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक गावंडे यांनी पुढाकार घेत प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांला वैयक्तिकरित्या प्रत्येकी ₹५०० चे रोख बक्षीस देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले. तसेच, दानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश खोडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना ₹१,०१ रुपयांचे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.
विमानाने इस्रोला भेट
या जिल्हास्तरीय निवड चाचणीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमानाने इस्रोच्या विविध ठिकाणी भेट देण्यासाठी नेले जाणार आहे. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल दामोदर, कोषाध्यक्ष किशोर दामोदर आणि इतर मान्यवर, शाळेचे माजी मुख्याध्यापक अन्सार खान, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेचे मुख्याध्यापक व संपूर्ण शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.