Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 2800 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

दक्षिण मध्य रेल्वेने हजारो शिकाऊ उमेदवारांच्या Apprentice पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही संधी विशेषतः तरुण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ज्यांनी १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 02:58 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तरुण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
  • एकूण २,८०१ रिक्त पदे भरली जाणार
  • निवड प्रक्रिया परीक्षेशिवाय
Railway Requirment : दक्षिण मध्य रेल्वेने हजारो शिकाऊ उमेदवारांच्या Apprentice पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही संधी विशेषतः तरुण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ज्यांनी १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आयटीआय (ITI) अभ्यासक्रम पूर्ण केला आहे ते यासाठी अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण २,८०१ रिक्त पदे भरली जाणार आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोणते उमेदवार अर्ज भरु शकतात किंवा कशा पद्धतीची कार्यपद्धती आहे याबाबतची माहिती पुढे दिलेली आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळाद्वारे आपले अर्ज भरू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे, अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

AI Alpha School: एआय अल्फा स्कूल म्हणजे काय? ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं कोटींमध्ये करणार कमाई, नाहीतर पैसे परत

कोण अर्ज करू शकते?

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याकरिता काही आवश्यक पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यामध्ये किमान ५० टक्के एकूण गुण मिळवलेले असावेत. याव्यतिरिक्त, संबंधित ‘ट्रेड’मध्ये (व्यावसायिक शाखेत) आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेतून प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादेबाबत काही निकष ठरवले आहेत. उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या वयोपात्रतेची गणना अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीनुसार म्हणजेच ११ एप्रिल २०२६ या तारखेनुसार केली जाईल.

निवड प्रक्रिया परीक्षेशिवाय

या भरती प्रक्रियेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे त्यांच्या गुणवत्तेच्या (Merit) आधारे केली जाईल. १० वीची परीक्षा आणि आयटीआय अभ्यासक्रम या दोन्हीमध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या दोन्ही शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांना समान महत्त्व दिले जाणार आहे. परिणामी, ज्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण अधिक असतील, त्यांची निवड होण्याची शक्यता अधिक असेल.

अर्ज शुल्क किती आहे?

या भरती मोहिमेसाठीचे अर्ज शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाइन पेमेंट पद्धतींचा वापर करून जमा करणे आवश्यक आहे. या उद्देशासाठी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. शुल्क जमा करताना, उमेदवारांनी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि अर्ज क्रमांक अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे. या डिटेंल फार महत्त्वाच्या आहेत.

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. त्यानंतर, उमेदवारांनी भरतीशी संबंधित लिंक उघडावी.
त्यानंतर, उमेदवारांनी आपली माहिती भरून नोंदणी करावी.
आता, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
त्यानंतर, उमेदवारांनी अर्ज शुल्क भरावे. जी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे.
आता, उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
शेवटी, उमेदवारांनी आपल्या दप्तरी नोंदीसाठी अर्जाची एक प्रत जपून ठेवावी.

करिअर करताना प्रेम कसे सांभाळावे? होतेय डोकेफोडी? टेन्शन टाळा! सांगितलंय तितकं पाळा!

Web Title: A golden opportunity for a job in the railways recruitment process underway for over 2800 vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Career News
  • Indian Railway
  • Railway Job

संबंधित बातम्या

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
1

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Pune Nashik Railway Route: खेड विमानतळ पुरंदरला अन् पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे? उत्तर पुण्यावर अन्यायाची भावना
2

Pune Nashik Railway Route: खेड विमानतळ पुरंदरला अन् पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे? उत्तर पुण्यावर अन्यायाची भावना

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vande Bharat Train Loco Pilot: वंदे भारत ट्रेनचा लोको पायलट बनायचंय? जाणून घ्या AtoZ माहिती
4

Vande Bharat Train Loco Pilot: वंदे भारत ट्रेनचा लोको पायलट बनायचंय? जाणून घ्या AtoZ माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.