फोटो सौजन्य - Social Media
देशामध्ये बेरोजगारीची समस्या फार वाढत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आलेली आहे. डेप्युटी डायरेक्टरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. तसेच या भरतीच्या माध्यमातून सिनिअर अकाउंटच्या पदांसाठी उमेदवारांचे नियुक्ती करण्यात येणार आहे. डेप्युटी डायरेक्टर किंवा सिनियर अकाउंटच्या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायची आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याचे विंडो खुली करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना 24 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना दिलेल्या वेळेच्या मदतीच्या आत अर्ज करायचे आहे. वेळेनंतर करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
हे देखील वाचा : RRB ने जाहीर केले विविध पदांसाठी आयोजीत परीक्षेचे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा
UIDAI च्या भरती प्रक्रियेमध्ये डेप्युटी डायरेक्टर तसेच सीनियर अकाउंटंटच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तींना पात्र करणे गरजेचे आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंबंधीत आहेत. तसेच एका ठराविक आयु मर्यादेतील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या अटी शर्तींना पात्र उमेदवाराच नियुक्तीस आणि अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे. चार्टर्ड अकाउंटेंट, कॉस्ट अकाउंटंट, एमबीए इन फायनान्स किंवा एम एस असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करत्या उमेदवाराकडे किमान पाच वर्षाचे अनुभव असने अनिवार्य आहे. तर जास्तीत जास्त 56 वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अटी शर्ती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
अशाप्रकारे करता येईल अर्ज
उमेदवारांना त्यांच्या अर्जाच्या फॉर्मला ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण क्षेत्रीय कार्यालय, सहावा मजला, ईस्ट ब्लॉ, स्वर्ण जयंती कॉम्प्लेक्स, मातृवनमच्या जवळ, अमीरपेठ, हैदराबाद – 500038’ या पत्त्यावर पाठवावे लागेल. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा.






