Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा

ABVP Warning to DTE: वांद्रे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 01, 2026 | 11:22 AM
ABVP

ABVP

Follow Us
Follow Us:
  • अभाविपचा तंत्रशिक्षण संचालनालयाला जागे होण्याचा इशारा
  • विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
  • कालबद्ध कृती आराखडा राबविण्याची मागणी; अन्यथा आंदाेलन छेडणार
मुंबई, नीता परब

ABVP Warning to DTE: मुंबईतील वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना गेल्या काही काळापासून विविध मूलभूत सुविधा व पायाभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे गंभीर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या या समस्यांकडे महाविद्यालय प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अनेक समस्या अद्याप जैसे थे असून असून त्यावर अपेक्षित स्वरूपात ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तंत्रशिक्षण संचालनालयाकडे केली आहे.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत अभाविपच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाशी वेळोवेळी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी निवेदने व पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही अनेक मूलभूत समस्यांचे निरसन झाले नसल्याचा आराेप अभाविपने केला आहे.

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या

  • महाविद्यालय परिसरातील अपुरी व अस्वच्छ स्वच्छता व्यवस्था.
  • विद्यार्थ्यांसाठी पुरेशा व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसणे.
  • स्वच्छतागृहांची अपुरी संख्या तसेच स्वच्छतेचा अभाव
  • वर्गखोल्यांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव
  • प्रयोगशाळांमध्ये आवश्यक साधनसामग्री, उपकरणे व सुविधा अपुऱ्या असणे
  • महाविद्यालयातील विविध पायाभूत सुविधांची दुरवस्था
  • विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणाचा अभाव
या समस्यांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर, आरोग्यावर तसेच त्यांच्या एकूण शैक्षणिक वातावरणावर होत आहे. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील, तर त्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणावर आणि कौशल्यविकासावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकताे. याशिवाय विद्यार्थ्यांकडून नियमितपणे शुल्क वसूल केले जात असताना त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून न देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, स्वच्छ परिसर, योग्य वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे.

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?

विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागताे हे दुर्देव

अभाविपचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी हे दर्जेदार तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, स्वच्छ परिसर, योग्य वर्गखोल्या आणि सुसज्ज प्रयोगशाळा या विद्यार्थ्यांच्या चैनीच्या नव्हे, तर मूलभूत गरजा आहेत.

वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही समस्या कायम राहणे हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आहे.” “तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रकरणाची केवळ कागदोपत्री दखल न घेता तातडीने महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणतीही तडजोड अभाविप कदापि सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही न केल्यास विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अभाविपकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अभिषेक पवार यांनी दिला आहे.

NEET Protest Case: NEET आंदोलकांवरील FIR रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; दिल्ली पोलिसांची भूमिका काय?

अभाविपच्या वतीने तंत्रशिक्षण संचालनालयाकडे संबंधित मागण्या

– वांद्रे पूर्व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी.
– विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात याव्यात.
– महाविद्यालयातील स्वच्छता व्यवस्थेची तातडीने सुधारणा करण्यात यावी.
– विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
-स्वच्छतागृहांची संख्या वाढवून त्यांची नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करण्यात यावी.
– वर्गखोल्यांमधील आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात.
-प्रयोगशाळांमध्ये आवश्यक उपकरणे, साधनसामग्री व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
-महाविद्यालयातील खराब व जीर्ण झालेल्या पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
-विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात यावे.

विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी कालबद्ध कृती आराखडा निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

Web Title: Abvp warn dte mumbai government polytechnic student issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • education
  • Protest

संबंधित बातम्या

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू
1

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
2

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
3

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
4

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.