Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Court Staff Protestः महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयीन कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या न्यायहक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने समान वेतानासह कामासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. याचा दुसरा टप्पा 16 व 17 ऑक्टोबरला पार पडेल.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 15, 2026 | 06:43 PM
Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Follow Us
Follow Us:
  • काळ्या फिती लावून नियमित कामकाज
  • समान काम, समान वेतनाची मागणी
  • निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहभाग
 

नीता परब, मुंबई

महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयीन कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या न्यायहक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने समान वेतानासह कामासाठी आंदोलन (Court Staff Protest) करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचा दुसरा टप्पा 16 ते 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी चंद्रकांत बनकर यांनी दिली.

काळ्या फिती लावून नियमित कामकाज

आंदोलनाच्या दुसर्‍या टप्यात 16 आणि 17 ऑक्टोबर राज्यातील सर्व कार्यरत न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून नियमित कामकाज करणार आहे. तसेच 17 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील निवृत्त न्यायालयीन कर्मचारी स्वयंस्फूर्तीने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करुन सध्या कार्यरत असलेल्या न्यायालयीन कर्मचार्‍यांच्या मागणीला पाठिंबा देणार आहेत.

दुय्यम न्यायालयीन कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयातील कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याबाबत प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष समितीच्या 31 जानेवारी 2025 च्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव अद्याप मुख्यमंत्री कार्यालयात मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहे.

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

समान काम, समान वेतनाची मागणी

प्रस्ताव प्रलंबित राहून सुमारे वीस महिने उलटले तरी शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे राज्यातील न्यायलयीन कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी असून शासनाचा या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन टप्याटप्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. समान काम, समान वेतन ही महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयीन कर्मचार्‍यांची न्याय मागणी असून त्यांना उच्च न्यायालयातील कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळणे हा त्यांचा हक्काचा प्रश्‍न आहे.
न्यायालयीन कर्मचारी न्यायव्यवस्थेच्या कामकाजात महत्त्वपूर्व योगदान देत असताना त्यांच्या वेतनवाढीचा प्रस्तावावर निर्णय घेण्यास होत असलेला विलंब दुर्देवी आहे. या आंदोलनात निवृत्त न्यायालयीन कर्मचार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा

निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहभाग

कार्यरत व निवृत्त कर्मचार्‍यांच्या एकजुटीतून शासनाचे लक्ष वेधून घेऊन प्रलंबित वेतनश्रेणी प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी हा या आंदोलनामागील मुख्य उद्देश असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने आंदोलनाचा दुसरा टप्पा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.

त्यामुळे या दुसर्‍या टप्यातील आंदोलनाला राज्यातील सर्व कार्यरत आणि निवृत्त न्यायालयीन कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन कशासाठी आहे?

    Ans: दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

  • Que: आंदोलनाचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे?

    Ans: आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी राबविण्यात येणार आहे.

  • Que: आंदोलनामागील मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: प्रलंबित वेतनश्रेणी प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी आणि समान कामासाठी समान वेतनाची मागणी मान्य व्हावी, हा आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: Court staff protest maharashtra equal pay demand october 16 17 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Protest
  • Worker Strike

संबंधित बातम्या

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश
1

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी
2

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
3

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
4

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.