Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्धा महिना उलटला तरीही शिक्षकांना पगार नाहीच; शिक्षण विभागाच्या कारभारावर संताप

बँकेचा दंड आणि कौटुंबिक ओढाताण शिक्षकांच्या घरांच्या कर्जाचे हफ्ते अनेकांचे दर महिन्याच्या ५ तारखेला असतात. मात्र, महिन्याची १५ तारीख उजाडली तरी पगार बँक खात्यात जमा होत नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 08:45 AM
पवित्र पोर्टलवरून आता होणार शिक्षक भरती; 31 मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश

पवित्र पोर्टलवरून आता होणार शिक्षक भरती; 31 मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:

नाशिक : राज्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित होत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही जिल्हास्तरीय यंत्रणा ढिम्म असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार शिक्षण विभागात सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

बँकेचा दंड आणि कौटुंबिक ओढाताण शिक्षकांच्या घरांच्या कर्जाचे हफ्ते अनेकांचे दर महिन्याच्या ५ तारखेला असतात. मात्र, महिन्याची १५ तारीख उजाडली तरी पगार बँक खात्यात जमा होत नाहीत. यामुळे बँकांकडून शिक्षकांना दंड आकारला जात आहे. नियमित पगार मिळत नसल्याने घराचा किराणा, वृद्ध आई-वडिलांचे औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणाची फी भरायची कशी, असा गंभीर प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे कारण पुढे करून इतर कर्मचारी आणि अधिकारी आपली नियमित कामे करण्यासही टाळाटाळ करत आहेत.

दरम्यान, अधिकाऱ्यांमधील आत्मविश्वास पूर्णपणे लोप पावल्याचे चित्र असून, याचा फटका प्रामाणिक शिक्षकांना बसत आहे. शिक्षकांच्या मान्यता, बदली झालेल्या शिक्षकांचे ‘डीटीएच अटॅचमेंट’ यांसारखी साधी कामेही जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी करण्यास तयार नाहीत.

वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असूनही काम नाहीच

वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असूनही स्थानिक यंत्रणा काम करायला तयार नाही, ही खेदाची बाब आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे नीतिमूल्य शिकवणाऱ्या शिक्षकांवरच आज शासनाविरोधात संघटित होऊन संघर्ष करण्याची वेळ आली आहे, ही मोठी शोकांतिका आहे.

कोविड काळातही झाले होते पगार

कोविडसारख्या अति संकटाच्या काळात सुद्धा नियमित पगार झाले. यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या दैनंदिन अडचणी तसेच बँकेचे लोन हप्ते याबाबत त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहेत. यापूर्वी शासनाने एक तारखेस पगार होतील तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक काढले होते त्याचा मात्र विसर पडल्याचे दिसत आहे, असे खासगी प्राथमिक महासंघाचे अध्यक्ष दलाल धांडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी

शिक्षक संघटनांनी या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. शासनाने यावर ठोस धोरण ठरवून पगारासाठी एक निश्चित तारीख ठरवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. जे अधिकारी वेळेवर पगार करत नाहीत किंवा शिक्षकांना मानसिक त्रास देतात, त्यांना कठोर शब्दांत समज देऊन त्यांच्यात जनसेवेचा वसा रुजवावा, अशी आग्रही मागणी शिक्षकांनी केली आहे.

आरटीओचा अजब कारभार! महाराष्ट्रात धावणाऱ्या ‘बुलेट’चा नंबर कर्नाटकात ‘चारचाकी’ला; पाचगणीच्या वाहनधारकाची न्यायासाठी पायपीट

Web Title: After half a month has passed teachers have not yet to receive their salaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • education news
  • Nashik News
  • Teacher Salary

संबंधित बातम्या

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
1

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही
2

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.