Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Layoffs 2026: एआयमुळे ९ हजार कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड! ‘या’ नामवंत जागतिक कंपनीने जाहीर केली मोठी नोकरकपात

British American Tobacco AI Layoffs 2026 : कृत्रिम बुद्धिमत्ता आता लाखो तरुणांच्या रोजगारासाठी धोक्याची घंटा ठरतेय का? 'BAT' कंपनीच्या या ऐतिहासिक नोकरकपातीमुळे भारतासह ब्रिटनमध्ये का चिंता व्यक्त केली जात आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 29, 2026 | 05:14 PM
layoff

layoff

Follow Us
Follow Us:

British American Tobacco AI Layoffs 2026 : आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (AI) भविष्यातील तंत्रज्ञान मानले जात होते, परंतु आता ते लाखो कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठे संकट बनत चालले आहे. जगातील मोठ्या कंपन्या मानवाऐवजी मशीनकडून काम करून घेण्याच्या तयारीत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘ब्रिटिश अमेरिकन टोबॅको’ (BAT) कंपनी, जिने एकाच वेळी ९,००० नोकऱ्या संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ५,५०० कर्मचाऱ्यांची नोकरी याच वर्षाच्या (२०२६) अखेरपर्यंत जाईल, तर उर्वरित ३,५०० पदे बाह्य धोरणात्मक भागीदारांकडे सोपवली जातील. यामुळे खर्च कमी होऊन कामकाज अधिक वेगवान होईल, असा कंपनीचा दावा आहे.

एवढी मोठी नोकरकपात का?

BAT कंपनीने हा निर्णय आपल्या ‘Fit2Win’ कार्यक्रमांतर्गत घेतला आहे. कंपनीने २०२८ पर्यंत ६०० दशलक्ष पाउंड म्हणजेच सुमारे ७५,००० कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी त्यांनी जागतिक आयटी कंपनी ‘Accenture’ सोबत भागीदारी केली आहे. एक्सेंचर कंपनी प्रगत एआय सोल्युशन्स (Advanced AI Solutions) उपलब्ध करून देईल, ज्यामुळे आतापर्यंत कर्मचारी करत असलेली कामे ऑटोमेशनद्वारे पूर्ण केली जातील.

AI Era Career Options: एआयच्या काळात कोणती पदवी टिकवून ठेवणार तुमची नोकरी? जाणून घ्या सविस्तर

कोणावर होणार परिणाम?

कर्मचारी कपातीचे स्वरूप: ९,००० पदांपैकी ५,५०० कर्मचाऱ्यांची नोकरी २०२६ च्या अखेरीस संपेल. उर्वरित ३,५०० पदे बाह्य भागीदारांकडे वर्ग केली जातील.

CEO चे स्पष्टीकरण: कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तादेउ मरोक्को यांनी सांगितले की, बदलत्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल.

ब्रिटेन सरकारची चिंता: मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नोकरकपातीमुळे पुढील १० वर्षांत ब्रिटनची सामाजिक कल्याण व्यवस्था (Welfare System) संकटात येऊ शकते, अशी चिंता सरकारने व्यक्त केली आहे.

Merchant Navy: मर्चेंट नेव्हीत करिअर कसे करावे? जाणून घ्या पात्रता, प्रवेश परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील

भारतावर काय होणार परिणाम?

BAT ची भारतातील ‘ITC’ कंपनीमध्ये सुमारे २२.९ टक्के हिस्सेदारी आहे, तसेच त्यांनी बंगळुरूमध्ये ‘ग्लोबल डिजिटल आणि टेक्नॉलॉजी हब’ सुरू केले आहे. तज्ज्ञांच्या मते, एआयचा सर्वाधिक फटका ‘एंट्री-लेव्हल’ (सुरुवातीच्या) नोकऱ्यांवर पडू शकतो. यामुळे फ्रेशर्स तरुण आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आता एआय, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि मशीन लर्निंग यांसारखी डिजिटल कौशल्ये शिकणे अत्यंत अनिवार्य झाले आहे.

Web Title: Ai layoffs british american tobacco bat accenture it job cuts 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • ai
  • job controversy
  • layoffs

संबंधित बातम्या

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
1

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला
2

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला

AI in Education: एआयवर अवलंबून राहणे पडेल महागात; IIT खडकपूरच्या प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना महत्त्वाची चेतावणी
3

AI in Education: एआयवर अवलंबून राहणे पडेल महागात; IIT खडकपूरच्या प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना महत्त्वाची चेतावणी

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
4

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.