Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineering Admission Ban: AICTE चा मोठा दणका! देशभरातील ५८ कॉलेजेस करण्यात आली बंद; जाणून घ्या नेमका विषय काय?

Engineering Admission Ban 2026: इंजिनीअरिंग आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रात अचानक खळबळ का उडाली आहे? विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि प्राध्यापकांची कमतरता यांमुळे AICTE ने ५८ कॉलेजेस आणि ९५० हून अधिक कोर्सेस बंद करण्याचा निर्णय घेतला. जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 06, 2026 | 02:15 PM
ban

ban

Follow Us
Follow Us:

Engineering Admission Ban 2026: दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपल्या करिअरची सुरुवात करण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, जर एखाद्या कॉलेजमध्ये अचानक नवीन प्रवेश बंद झाले, तर सर्वात पहिला प्रश्न हाच पडतो की, नक्की असे का झाले आणि तेथे आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल? सध्या अशीच माहिती देशातील इंजिनीअरिंग आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रातून समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशभरातील ५८ इंजिनीअरिंग आणि तांत्रिक संस्थांमध्ये नवीन प्रवेश घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

परंतु, या कॉलेजांमध्ये आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागणार नाही. ते निश्चित कालावधीपर्यंत आपले शिक्षण सुरू ठेवू शकतील आणि आपली पदवी पूर्ण करू शकतील. नक्की असे काय घडले की ही कॉलेजेस बंद करण्याची वेळ आली? चला तर मग जाणून घेऊया

देशभरातील ५८ कॉलेजेस का बंद करण्यात आली?

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) या संस्थांना ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ (Progressive Closure) साठी मंजुरी दिली आहे. याचा अर्थ असा की, संबंधित कॉलेजेस नवीन शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत; मात्र ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच झाले आहेत, त्यांचे वर्ग आणि परीक्षा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. AICTE नुसार, एखाद्या संस्थेला प्रोग्रेसिव्ह क्लोजरची परवानगी मिळण्यामागे  अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटणे, आवश्यक संख्येमध्ये पात्र प्राध्यापक (Faculty) उपलब्ध नसणे, पायाभूत सुविधा आणि इतर शैक्षणिक मानके पूर्ण न करणे, कॉलेज चालवण्याशी संबंधित नियम आणि AICTE च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या घटकांचा समावेश आहे.

Highest Salary IIM: एमबीए पूर्ण करताच थेट कोट्यवधींचे पॅकेज! ‘या’ आयआयएममध्ये प्रवेश मिळताच विद्यार्थ्यांचे नशीब उजळते

या कारणांमुळे अनेक संस्थांनी स्वतःहून बंद होण्याचा पर्याय निवडला, तर काही संस्थांना निर्धारित मानकांवर खरे न उतरल्यामुळे नवीन प्रवेशाची परवानगी मिळाली नाही. या ५८ संस्थांपैकी केवळ ३ संस्था सरकारी अनुदानित आहेत, तर उर्वरित सर्व खाजगी संस्था आहेत. ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच 12-12 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

९५० हून अधिक तांत्रिक कोर्सेसही बंद

केवळ संस्थाच नव्हे, तर २०२५ ते २०२६ दरम्यान संपूर्ण भारतात ९५० हून अधिक इंजिनीअरिंग आणि तांत्रिक कोर्सेस (अभ्यासक्रम) देखील बंद करण्यात आले आहेत. परंतू, जर एखादा विद्यार्थी अशा कॉलेजमध्ये शिकत असेल ज्याला प्रोग्रेसिव्ह क्लोजरची मंजुरी मिळाली आहे, तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचे शिक्षण नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि तो त्याच संस्थेतून आपला कोर्स पूर्ण करू शकेल. या निर्णयाचा परिणाम केवळ नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होईल.

AI in School Syllabus: शाळांमध्ये AI च्या शिक्षणाचा श्रीगणेशा! शालेय अभ्यासक्रमात सरकार नेमका काय बदल करतंय?

Web Title: Aicte engineering admission ban college closure latest update impact on students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Engineering College
  • maharashtra
  • School Closed

संबंधित बातम्या

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
1

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर
2

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
3

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
4

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.