
AIIPMR
AIIPMR Mumbai recruitment 2026 : सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई येथील अखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनर्वास संस्थान (AIIPMR) मध्ये कंत्राटी स्वरूपातील स्पेशालिस्ट पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या या संस्थेत एकूण ४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
यामध्ये फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन (PMR), अनेस्थेसिया, रेडिओ-डायग्नोसिस आणि मेडिसिन या प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी १ जागेवर ही भरती केली जाईल. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,२३,५०० रुपयांचे एकत्रित मानधन दिले जाणार असून, ही नियुक्ती १ वर्षासाठी किंवा नियमित उमेदवार मिळेपर्यंत राहील. एकूण जागांपैकी १ जागा पीडब्ल्यूडी (PWBD) प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे, मात्र या प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर उमेदवारांचा विचार केला जाईल.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २ आणि ३ सप्टेंबर २०२६ रोजी वॉक-इन-इंटरव्यू पार पडणार आहेत. इच्छुकांनी सकाळी ९:०० ते ९:३० वाजेदरम्यान संस्थेच्या हाजी अली, महालक्ष्मी, मुंबई येथील कार्यालयातील रूम नंबर २०१ येथे उपस्थित राहावे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी, संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) किंवा डिप्लोमा असणे आवश्यक असून, पोस्ट ग्रॅजुएट पदवीनंतर ३ वर्षे किंवा प्रमाणपत्रांतर ५ वर्षांचा अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे.
तसेच या सर्व पदांसाठी अर्जदाराचे कमाल वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांनी संस्थेच्या www.aiipmr.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून तो पूर्णपणे भरून घ्यावा आणि मुलाखतीच्या वेळी जन्म दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, वैध कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
NEET UG Counselling राउंड १ चे सीट अलॉटमेंट जाहीर; किती जागांवर झाले प्रवेश आणि कट ऑफ किती राहिला?