Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death: शिक्षण कमी पण करिअर दांडगा! किती शिकलेत अजित पवार? जाणून घ्या

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 28, 2026 | 11:16 AM
Ajit Pawar Death: अजित पवारांचे शिक्षण किती? जाणून घ्या त्यांचं संपूर्ण राजकीय प्रवास

Ajit Pawar Death: अजित पवारांचे शिक्षण किती? जाणून घ्या त्यांचं संपूर्ण राजकीय प्रवास

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे.
  • अजित पवार यांचे शिक्षण किती?
  • शिक्षण कमी असला तरी राजकीय प्रवास दांडगा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज एका विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्यातील इतका मोठा नेता गमावणे म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. राजकीय वर्तुळात ही अत्यंत दुःखद बातमी असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती येथे प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवासात अजित पवार यांच्यासह इतर सहा जणही विमानातून जात होते. मात्र, विमान बारामतीला पोहोचण्यापूर्वीच अपघातग्रस्त झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Ajit Pawar Death : टोमणे, चिमटे सरळ भाषेत सणसणीत वार; अजित पवारांचे गाजलेले डायलॉग्स

अजित पवारांचे शिक्षण

२२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. त्यांच्या शिक्षणाबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी फक्त माध्यमिक शिक्षण (SSC) पूर्ण केले होते. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या अजित पवारांनी एकूण सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती.

अजित पवार यांची राजकीय कारकीर्द

पवार कुटुंबातील असल्यामुळे राजकारणात प्रवेश त्यांच्यासाठी तुलनेने सोपा होता, मात्र त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. १९८२ मध्ये त्यांनी साखर सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सुमारे १६ वर्षे काम केले.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांचे विमान का कोसळले? विमान वाहतूक तज्ज्ञांनी उघड केली ७ प्रमुख कारणे

१९९१ नंतर ते अनेक वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांची लोकसभा सदस्य म्हणूनही निवड झाली होती. अजित पवार एकूण सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले असून, विविध सरकारांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर काम केले.

अजित पवार हे कार्यक्षम, धोरणदृष्ट्या स्पष्ट आणि मेहनती नेतृत्वासाठी ओळखले जात होते. ते जनतेशी संवाद साधणारे आणि सरळ भाषेत आपले विचार मांडणारे नेते म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असून, सर्व पक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

 

Web Title: Ajit pawar death what is ajit pawars education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • DCM Ajit Pawar

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: प्रशासनावर वचक, राजकारणातही दबदबा…! असा होता महाराष्ट्राच्या राजकारणातला ताकदवान चेहरा
1

Ajit Pawar Plane Crash: प्रशासनावर वचक, राजकारणातही दबदबा…! असा होता महाराष्ट्राच्या राजकारणातला ताकदवान चेहरा

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचे अपघाती निधन; शरद पवार हे दिल्लीवरुन तातडीने रवाना
2

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचे अपघाती निधन; शरद पवार हे दिल्लीवरुन तातडीने रवाना

Ajit Pawar Plane Crash : सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अजितदादा होते सर्वांचे लाडके
3

Ajit Pawar Plane Crash : सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अजितदादा होते सर्वांचे लाडके

Palne Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत
4

Palne Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.