Ajit Pawar Death : टोमणे, चिमटे सरळ भाषेत सणसणीत वार; अजित पवारांचे गाजलेले डायलॉग्स
अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते शरद पवार यांचे पुतणे असूनही, त्यांनी केवळ वारशावर न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 1991 मध्ये बारामती मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
बोलण्याची शैली होती खास….
राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज माध्यम या सर्वच ठिकाणी अजित पवार यांची फक्त राजकीय नेते म्हणून नाही तर एक दादा म्हणून वेगळी ओळख होती. अजित पवार अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. जलसंपदा, अर्थ, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी हाताळली. विशेषतः सिंचन प्रकल्प आणि ग्रामीण विकासावर त्यांनी मोठा भर दिला. त्यांच्या कामाचा वेग, निर्णयक्षमता आणि प्रशासनावर पकड यामुळे ते “कामाचा नेता” म्हणून ओळखले जातात. अजित पवारांची सर्वात जास्त चर्चा होते ती त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे. ते फारसे अलंकारिक भाषण करत नाहीत. थेट मुद्द्यावर येणे, स्पष्ट शब्दांत बोलणे आणि गरज पडल्यास अधिकाऱ्यांवर किंवा विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेणे, ही त्यांची शैली आहे. त्यामुळेच त्यांची भाषणे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली.
अजित पवारांचे काही लोकप्रिय आणि गाजलेले संवाद जे आजही असतात चर्चेत :
“उगाच नाटकं करू नका, काम करा.”
“मी सांगतोय म्हणजे करायचंच.”
“लोकांना पाणी हवंय, भाषण नको.”
“काम नाही केलं तर घरी बसवू.”
“शेतकऱ्यांचा संयम संपला आहे.”
“आम्ही बोलत नाही, करून दाखवतो.”
“आपण बाटली तोंडात घातली की मोकळीच करून सोडतो…पाण्याची”
“काय काय लोक हात देताना मुके पण घ्यायचे, बायकोने कधी एवढे मुके घेतले नाहीत”
“कॉलेजला मुलं आणा बोलले, आता वय झालं नाय तर खरंच आणली असती”
“तुला काय मी म्हातारा वाटलो काय, पाहिजे ते करायला सांग.. नाय केलं तर पवार कसला”
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू; दिवसभरात चार सभा होत्या नियोजित
हे संवाद कधी गंभीर संदेश देतात, तर कधी नकळत हास्य निर्माण करतात. त्यांच्या भाषणात ग्रामीण ढंग, लोकभाषा आणि अनुभवातून आलेली थेट भाषा दिसते. एकूणच, अजित पवार हे सरळ, कठोर पण परिणामकारक वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बोलण्याची शैली आवडो वा न आवडो, पण ती दुर्लक्षित करता येत नाही आणि हाच त्यांच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रभाव मानला जातो.






