Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Mandir Recruitment: राम मंदिरात ‘काउंटिंग स्टाफ’ची भरती कशी होते? जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया एका क्लिकवर..

Ayodhya Ram Mandir Recruitment: अयोध्या राम मंदिरातील चढावा चोरीच्या वादानंतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया चर्चेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अंतर्गत अकाउंटंट, असिस्टंट आणि मोजणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी होते? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 04, 2026 | 03:31 PM
RAM MANDIR

RAM MANDIR

Follow Us
Follow Us:

Ayodhya Ram Mandir Recruitment: अयोध्येत मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. यासोबतच राम मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत, मंदिरात देणगी मोजणारे (काउंटिंग कर्मचारी) किंवा इतर कर्मचाऱ्यांची भरती कशी केली जाते, हे जाणून घेऊया.

राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या रोख देणगीची मोजणी करणे हे अत्यंत जबाबदारीचे काम मानले जाते. या कामात गुंतलेले कर्मचारी ठरवून दिलेल्या नियमांनुसार देणगीची मोजणी करतात, त्याची नोंद ठेवतात आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करतात. सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन हे काम सीसीटीव्ही (CCTV) देखरेखीखाली केले जाते आणि अनेक स्तरांवर त्याची तपासणीही होते.

वृत्तानुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्वतंत्रपणे प्रत्येक वेळी ‘काउंटिंग कर्मचारी’ या नावाने भरती काढत नाही. गरजेनुसार प्रशासकीय, अकाउंटंट, कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant), सपोर्ट स्टाफ किंवा इतर संबंधित पदांसाठी भरती जाहीर केली जाते. जर देणगी मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासली, तर संबंधित विभागाच्या माध्यमातून नियुक्ती केली जाते. त्यामुळे उमेदवारांनी केवळ ट्रस्टच्या अधिकृत भरती सूचनेवरच विश्वास ठेवला पाहिजे.

निवड प्रक्रिया कशी होते?

अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्वात आधी उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाते. यानंतर गरजेनुसार लेखी परीक्षा, स्किल टेस्ट किंवा मुलाखत  घेतली जाऊ शकते. अंतिम निवडीपूर्वी कागदपत्रांची पडताळणी आणि पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी देखील केली जाते. सर्व प्रक्रिया  औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच नियुक्ती दिली जाते.

Jobs In Dubai: भारतात बी.एड. पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी दुबईत नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ नियम एकदा वाचाच..

भरतीची माहिती कोठे मिळते?

जेव्हा जेव्हा श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला कोणत्याही पदासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, तेव्हा भरतीची माहिती ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटवर आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केली जाते. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अनोळखी वेबसाईट, एजंट किंवा सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवण्याऐवजी केवळ अधिकृत सूचनेचीच वाट पाहिली पाहिजे.

कोण करू शकते अर्ज?

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. जर काम अकाउंटिंग किंवा रेकॉर्डशी संबंधित असेल, तर कॉमर्स, अकाउंट्स किंवा संबंधित विषयात पदवी घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. यासोबतच संगणकाचे सामान्य ज्ञान, रेकॉर्ड सांभाळण्याची क्षमता आणि प्रामाणिकपणा यांसारखे गुण उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. काही पदांवर अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाऊ शकते.

Education New Rules: NEET-JEE च्या रँकिंगसाठी १२ वीचे गुण ठरणार का गेमचेंजर? शिक्षण मंत्रालयाचा ‘हा’ नवा ‘वेटेज प्लॅन’ लगेच वाचा

Web Title: Ayodhya ram mandir recruitment process counting employees eligibility official update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Job
  • Jobs Recruitment
  • ram mandir

संबंधित बातम्या

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
1

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!
2

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती
3

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..
4

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.