फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Teaching jobs in Dubai: भारतातून बी.एड. (B.Ed.) करून परदेशात करिअर करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये उत्तम संधी आहे. दुबई, अबू धाबी आणि शारजाह सारख्या शहरांमध्ये जाऊन शिकवणे हा भारतीय शिक्षकांमध्ये एक ट्रेंड बनला आहे. तेथील करमुक्त (Tax-free) पगार, जागतिक दर्जाची जीवनशैली आणि मोठ्या संख्येने असलेले भारतीय कुटुंब ही यामागील प्रमुख कारणे आहेत.
यूएईच्या खाजगी शिक्षण क्षेत्रात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भारतीय शिक्षकांना ओळखीचाच अभ्यासक्रम शिकवावा लागतो. मात्र, तेथील नियम अत्यंत कडक असून वर्गात पाऊल ठेवण्यापूर्वी काही पदव्या, कागदपत्रांचे प्रमाणीकरण आणि सरकारी परवाना असणे अनिवार्य आहे.
दुबईतील शाळांची देखरेख ‘KHDA’ करते, तर अबू धाबीमध्ये ही जबाबदारी ‘ADEK’ कडे आहे. सरकारी शाळांमध्ये परदेशी नागरिकांची भरती नगण्य असल्याने भारतीय शिक्षकांनी सीबीएसई किंवा इंटरनॅशनल खाजगी शाळांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
प्राथमिक (Primary) स्तरावर शिकवण्यासाठी बी.एड. पदवी पुरेशी आहे. परंतु, माध्यमिक किंवा वरिष्ठ वर्गांसाठी बी.एड. सोबतच संबंधित विषयात (उदा. गणित, विज्ञान) पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे.
कागदपत्रांचे प्रमाणीकरण (Attestation): तुमच्या पदव्या भारतातील संबंधित राज्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालय (HRD), परराष्ट्र मंत्रालय आणि दिल्लीतील यूएई दूतावासाकडून प्रमाणित कराव्या लागतात. यूएईमध्ये पोहोचल्यावर तेथील परराष्ट्र मंत्रालयाची (MOFAIC) मोहोरही आवश्यक असते.
IELTS परीक्षा: इंग्रजीचे शिक्षक होण्यासाठी ‘IELTS’ परीक्षेत किमान ७.० बँड स्कोर आणि इतर विषयांसाठी ६.० ते ६.५ बँड स्कोर आवश्यक आहे.
अनुभव आणि इतर: १-२ वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य मिळते. तसेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते.
यूएईमध्ये ‘एज्युकेशन प्रोफेशनल लायसन्स’ (TLS) शिवाय शिकवता येत नाही. शाळा कडून जॉब ऑफर मिळाल्यानंतर या सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर अध्यापन पद्धतीवर आधारित एक परीक्षा होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण ३ संधी मिळतात.
इच्छुक उमेदवार आपली कागदपत्रे आणि सीव्ही (CV) तयार ठेवून GulfTalent, Bayt किंवा LinkedIn सारख्या प्लॅटफॉर्मवरून नोकरीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन मुलाखत उत्तीर्ण झाल्यावर संबंधित शाळा वर्क व्हिसा स्पॉन्सर करते






