फोटो सौजन्य - Social Media
BIS म्हणजे भारतीय मानक ब्यूरोने २०२५ साठी सल्लागार पदांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. ही भरती प्रक्रिया जाहिरात क्रमांक No. 01 (Consultant)-(SCMD)/2025/HRD अंतर्गत राबवण्यात येत आहे. १९ एप्रिल २०२५ पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार ९ मे २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतील.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे करार तत्त्वावर आधारित असून, विविध अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखांतील जसे की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, संगणक विज्ञान इत्यादी अनुभवी व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय मानकीकरण उपक्रमात योगदान देण्यासाठी एक उत्तम संधी आहे. यामध्ये उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव, तांत्रिक ज्ञान चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे जे उमेदवार मानकीकरण प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
पात्र उमेदवारांसाठी संधी आहे. अनुभव व शैक्षणिक पात्रता असलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. या निकषांना पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादे संदर्भात जाहीर असणाऱ्या निकषांनुसार, कमाल ६५ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. मुळात, या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही आहे. नियुक्तीची प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पात्रता व अनुभवावर आधारित शॉर्टलिस्टचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक ज्ञान चाचणी घेण्यात येईल. तर शेवटी मुलखात घेण्यात येईल. पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे माहिती दिली जाईल.
अशा प्रकारे करण्यात येईल अर्ज: