फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीत पालकांमध्ये सध्या आक्रोशाचे वातावरण आहे. खाजगी शाळांचे गगनाला भिडते दर पालकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? दिल्लीत अशा नियमाचेदेखील पालन केले जाते की विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेता येतो. या मोफत प्रवेशासाठी अर्ज करावा तरी नक्की कसा? जाणून घ्या. दिल्लीच्या खाजगी शाळांमध्ये दरवर्षी नर्सरी, केजी आणि पहिली वर्गासाठी EWS (Economic Weaker Section), DG (Disadvantaged Group) आणि CWSN (Children With Special Needs) या श्रेणींतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. या कोट्यांतर्गत काही जागा आरक्षित ठेवण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना पात्रता निकष पूर्ण करणं आवश्यक असतं.
दिल्लीतील खाजगी शाळांमध्ये 75% जागा सर्वसामान्यांसाठी तर उर्वरित 25% जागा या EWS/DG/CWSN कोट्यांसाठी राखीव असतात. अर्ज केल्यानंतर जर विद्यार्थी पात्र ठरले, तर ऑटोमेटेड लॉटरी सिस्टम (लकी ड्रॉ) द्वारे प्रवेश दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया RTE कायदा (Right To Education) अंतर्गत होते, त्यामुळे अर्जासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.
नर्सरीसाठी वयोमर्यादा 3 ते 5 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. केजीसाठी हेच वय 4 ते 6 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. पहिलीसाठी 5 ते 7 वर्षे वय असणे आवश्यक आहे. फक्त त्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो, ज्यांचे पालक EWS श्रेणीमध्ये येतात आणि वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असते. केवळ खाजगीच नव्हे तर MCD आणि MDMC मान्यताप्राप्त प्राथमिक शाळाही या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होतात.
अशा प्रकारे करा अर्ज: