Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Education: पालिका शिक्षण विभागाचा नवा उपक्रम; शैक्षणिक वर्षात सायन्स सोमवार अभ्यासक्रमात दाखल!

गणित गुरुवार' या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वतःहून मोबाईल किंवा टॅब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्त्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता या शैक्षणिक वर्षापासून 'सायन्स सोमवार' हा नवा उपक्रम सुरू होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2026 | 10:41 AM
BMC Education, Science Monday, Mumbai Schools, Ganit Guruwar, STEM Education, Khan Academy,

BMC Education, Science Monday, Mumbai Schools, Ganit Guruwar, STEM Education, Khan Academy,

Follow Us
Follow Us:
  • ‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’,
  • मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम अंतर्गत आयोजित बैठक व गुणगौरव समारंभ
  • गणित गुरुवार उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा पालिकेकडून गौरव
मुंबई/ नीता परबः BMC education department :  महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. यासोबतच आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्य सोमवार’ हा उपक्रम सुरु करण्याचा पालिका शिक्षण विभागाचा मानस आहे. येत्या काही दिवसात हा उपक्रम अभ्यासक्रमात दाखल होणार आहे.

महानगरपालिका शिक्षण विभाग व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम अंतर्गत आयोजित बैठक व गुणगौरव समारंभात महापौर रितू तावडे,उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, शिक्षण समिती सदस्य वर्षा टेंबुलकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन, शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक निपूण प्रधान, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणित गुरुवार उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.

बेस्टला १,०६० कोटींच्या अनुदानाला ब्रेक; जुन्या खर्चाचा हिशेब मागवत स्थायी समितीचा निर्णय

‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’, असा विद्यार्थ्यांना दुहेरी आनंद

महापौर रितू तावडे म्हणाल्या, ‘मिशन मेरिट आणि स्टेम सुधारणा कार्यक्रम’च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. ज्या ९३० हून अधिक शाळांमध्ये हा स्टेम कार्यक्रम राबवला गेला, त्या शाळांतील मुले खान अकॅडमीच्या माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर गणित आणि विज्ञानाचे अवघड प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. सुमारे सव्वा लाख विद्यार्थी या उपक्रमामुळे आधुनिक शिक्षण प्रवाहात आले आहेत. तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयात मिळवलेले अतिरिक्त प्राविण्य हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे यश आहे. ‘

गणित गुरुवार’ या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वतःहून मोबाईल किंवा टॅब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्त्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्स सोमवार’ हा नवा उपक्रम सुरू होत आहे. ‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’, असा दुहेरी आनंद आता महानगरपालिकेच्या शाळांतील मुलं घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सोमवारी विज्ञान आणि गुरुवारी गणित या समीकरणामुळे श्रीनिवास रामानुजन, डॉक्टर होमी भाभा किंवा डॉक्टर जयंत नारळीकर याच महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमधून घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच १५० गुणवंत विद्यार्यांना शालेय अभ्यासासाठी लॅपटॉप देणार असल्याचेही यावेळी तावडे यांनी सांगितले.

बेस्टला १,०६० कोटींच्या अनुदानाला ब्रेक; जुन्या खर्चाचा हिशेब मागवत स्थायी समितीचा निर्णय

शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच गणित गुरुवार सारखे उपक्रमांना प्राधान्य

शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच गणित गुरुवार सारखे उपक्रम राबविल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांसह पालकांचाही तितकाच वाटा आहे. गणित गुरुवार, सायन्स सोमवारप्रमाणे आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

Web Title: Bmc education department to introduce science monday in municipal schools this academic year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • BMC
  • Education Department
  • Mumbai News

संबंधित बातम्या

 ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
1

 ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने
2

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू
3

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर
4

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.