बेस्टला १,०६० कोटींच्या अनुदानाला ब्रेक
कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे
स्थायी समिती सदस्य आणि काँग्रेस गट नेते अश्रफ आझमी यांनी बेस्टच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भविष्यात सर्व कर्मचारी सेवानिवृत्त होतील आणि केवळ डेपोच शिल्लक राहतील, त्यामुळे लोकांना मेट्रोने प्रवास करण्यास भाग पडेल, असे ते म्हणाले. डॉ. सईदा खान यांनी बेस्ट बस अपघातांचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईत बेस्ट बस अपघात वाढत असून नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी गेल्या १४ वर्षातील बेस्टच्या खर्चाचा तपशील मागितला.
विशेष समिती स्थापन करावी
एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी म्हणाले की, बेस्टला १२.३१२ कोटी रुपयाचे अनुदान मिळाले आहे. परंतु ३०-३५ वर्षे सेवा केलेले अनेक चालक आणि वाहक अजूनही निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युइटीपासून वंचित आहेत. कुरेशी म्हणाले की, सकाळी आणि संध्याकाळी बसची संख्या जास्त असावी, परंतु दुपारच्या वेळी प्रवासी कमी असल्याने बसवे मार्ग बदलून तोटा कमी करता येईल, त्यानी बसवरील जाहिराती वाढवून महसूल वाढवण्याची आणि बेस्टमध्ये सुधारणा करण्यास्तठी स्थायी समितीप्रमाणेच एक विशेष समिती स्थापन करण्याची सूचना केली.
वेगनियंत्रणाचा अभाव
भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर म्हणाले की, बेस्टकडे मुंबईची जीवनरेखा म्हणून पाहिले पाहिजे आणि तिला आवश्यक अनुदान मिळाले पाहिजे. सुधारणेसाठी पावले उचलण्यात आली आहेत, असेही त्यांनी नमूद केले, ते म्हणाले की, पूर्वीच्या शासकांनी अनेक वर्ष बेस्टला कमकुवत केले, परंतु आता पालिकेच्या जमिनी विकसित करून आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करून बेस्टला त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळवून दिले पाहिजे.
मनसे गट नेते यशवंत किल्लेदार यांनी दादरमधील वेस्ट बस अपघाताचा संदर्भ देत सांगितले की, चालकांमध्ये वेगावर नियंत्रणाचा अभाव आहे. ते म्हणाले की, चालकांना केवळ पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते, तर वीजपुरवठा प्रणाली कालबाह्य झाली असून तिवे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. दादर, शिवडी आणि वरळी भागातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यातील खंडनावर त्यानी चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, मुंबईसारख्या महानगराची वीज्यणाली ग्रामीण भागासारखी असणे दुर्दैवी आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






