Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी

Bombay High Court Cook Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कुक पदाच्या १८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठी किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक असून मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आणि विविध प्रकारचे जेवण बनवण्याचे कौशल्य अपेक्षित आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 28, 2026 | 11:04 AM
Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास?( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास?( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कुक पदाच्या १८ जागांसाठी भरती.
  • किमान चौथी उत्तीर्ण उमेदवारांना अर्जाची संधी.
  • अर्ज स्पीड पोस्टाने १० सप्टेंबरपर्यंत पाठवावा.
 

4th Pass Government Jobs: शिक्षण कमी आहे म्हणून सरकारी नोकरी मिळवण्याची संधी संपत नाही. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. येथे कुक अर्थात स्वयंपाकी पदासाठी 18 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वयंपाकाची आवड आणि त्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत नेहमीच्या भरतीपेक्षा थोडी वेगळी आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. भरलेला अर्ज स्पीड पोस्टाने संबंधित पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. अर्ज 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज लवकर पाठवणे योग्य ठरेल.

एकूण किती जागा आहेत?

छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील कुकच्या एकूण 18 पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. यातील एक जागा दिव्यांग उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी तयार केली जाणार आहे.

चौथी पास असणे गरजेचे

या नोकरीसाठी उमेदवाराचे किमान शिक्षण चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नाही. उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषा समजणे आणि बोलता येणे अपेक्षित आहे. तसेच उमेदवाराला विविध प्रकारचे जेवण बनवता आले पाहिजे. शाकाहारी पदार्थांसोबत मांसाहारी पदार्थ तयार करण्याचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा प्रत्यक्ष अनुभव या भरतीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. Bombay High Court Cook Recruitment 2026:

कुकिंगचे शिक्षण आणि अनुभव असेल तर फायदा

स्वयंपाकाचा एखादा कोर्स केलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य मिळू शकते. त्यासाठी संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय तीन किंवा पाच तारांकित हॉटेलमध्ये कुक किंवा शेफ म्हणून किमान दोन वर्षे काम केलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे स्वयंपाकाचे कौशल्य आहे आणि त्यासोबत कामाचा अनुभवही आहे, त्यांच्यासाठी या संधीचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.

वयोमर्यादा किती?

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात आली असून, ते 43 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात. न्यायालयातील किंवा सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट लागू नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अर्ज कसा पाठवायचा?

उमेदवारांनी सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीची जाहिरात आणि अर्जाचा नमुना पाहावा. फॉर्म डाउनलोड करून त्यामध्ये शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज स्पीड पोस्टाने पाठवावा.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता असा आहे :

प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, बेंच औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – 431009. या भरतीसाठी अर्ज करताना स्वतंत्र शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र पुढील प्रक्रियेसाठी निवड झालेल्या उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क घेतले जाणार आहे.

खेळाडूंसाठी मोठी संधी! पश्चिम रेल्वेत ‘Sports Quota’ अंतर्गत बंपर भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..

कोणती कागदपत्रे लागतील?

  • अर्जासोबत शैक्षणिक गुणपत्रिका,
  • जन्मचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • कौटुंबिक घोषणा पत्र
  • सरकारी कर्मचारी असल्यास कार्यालयाची ना-हरकत प्रमाणपत्र
10वी-12वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Army Ordnance Corps मध्ये २,६१५ पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

फॉर्ममध्ये उमेदवाराला स्वतःला बनवता येणाऱ्या पाच पदार्थांची नावे देखील नमूद करावी लागणार आहेत. अर्जावर पाच रुपयांचे डाक तिकीट लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे. चौथी पास असून स्वयंपाकाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची संधी नक्कीच लक्ष देण्यासारखी आहे. मात्र अर्ज पाठवण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, कागदपत्रे आणि अंतिम मुदत तपासणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Bombay high court cook recruitment 2026 18 posts for 4th pass candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Career News
  • goverment news
  • Marathi News

संबंधित बातम्या

RRB एनटीपीसी सीबीटी २ परीक्षा कधी आहे? ४५,८९८ उमेदवार शॉर्टलिस्ट; ‘या’ तारखेपासून परीक्षा सुरू!
1

RRB एनटीपीसी सीबीटी २ परीक्षा कधी आहे? ४५,८९८ उमेदवार शॉर्टलिस्ट; ‘या’ तारखेपासून परीक्षा सुरू!

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह
2

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
3

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र
4

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.