फोटो सौजन्य - Social Media
बृहन्मुंबई महानगरपालिकेने भरतीचे आयोजन केले होते. मुळात, या भरतीच्या माध्यमातून दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदांसाठी उमेदवारांची मागणी करण्यात आली होती. या परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी २०२५ तसेच मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आले आहे. उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. परंतु, या भरतीच्या संबंधात काही महत्वाच्या गोष्टी आहेत. मुळात, या भरती संबंधात आयोजित परीक्षा खासगी केंद्रावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अर्ज कर्त्या उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
अधिकृत केंद्र उभारण्याऐवजी संगणक केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केल्याने गैरप्रकार होण्याची भीती असते. मुळात, याने परीक्षा रद्द होणे किंवा लांबणीवर जाणे असे परिणाम उद्भवू शकतात. त्यामुळे उमेदवारांचे वर्षे वाया जातात. त्यामुळे उमेदवार नाराज आहेत. खासगी केंद्रांना बदलून ‘टीसीएस आयओएन’ केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेने दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता (Secondary Engineer and Junior Engineer) या पदांसाठी आयोजित केलेल्या या परीक्षांची जबाबदारी IBPS कडे सोपवण्यात आली आहे. उमेदवारांचे म्हणणे आहे कि मुंबई महानगरपालिकेला अनेकदा परीक्षा केंद्रांबाबत कळवूनही त्यावर काही ऍक्शन घेतली जात नाही आहे. यामुळे उमेदवार असंतोष आहेत. मुळात, या आधीही खाजगी केंद्रावर परीक्षा आयोजित केली असल्याने उमेदवारांना भोगावे लागले होते. या गोष्टी पुन्हा घडू नये म्हणून आयबीपीएस’ मार्फत अधिकृत टीसीएस आयओएन केंद्रांसारखा पर्यायांचा उपयोग करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.
मृद व जलसंधारण विभाग, तलाठी भरती व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये खासगी संगणक केंद्रावर भरतीच्या परीक्षा राबवण्यात आल्याचा प्रकार घडून आला होता. अशा प्रकरणामुळे, पुन्हा परीक्षेचे आयोज़न करून फेरपरीक्षा घ्याव्या लागल्या होत्या. मुळात, यामध्ये राज्याचा धनतर व्या जातोच त्याचबरोबर उमेदवारांचा वेळ तसेच मेहनतही वाया जाते. काही गरीब विद्यार्थी तर फी भरून कोचिंग लावतात आणि अभ्यास करतात अशामध्ये अशा प्रकरणांमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेची दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता (Secondary Engineer and Junior Engineer) या पदांसाठी भरतीची परीक्षा परीक्षा टीसीएस आयओएन अधिकृत केंद्रांवरच घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.